NIA Raids In Goa Dainik Gomantak
देश

ISIS दहशतवादी अदनान हसन दोषी आढळला, NIA च्या स्पेशल कोर्टाचा मोठा निर्णय!

NIA: दिल्लीस्थित राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) विशेष न्यायालयाने आरोपी अदनान हसनला ISIS अबू धाबी मॉड्यूलशी संबंधित प्रकरणात दोषी ठरवले आहे.

Manish Jadhav

NIA Special Court Pronounced Accused Adnan Hassan Guilty ISIS: दिल्लीस्थित राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) विशेष न्यायालयाने आरोपी अदनान हसनला ISIS अबू धाबी मॉड्यूलशी संबंधित प्रकरणात दोषी ठरवले आहे. न्यायालयाने त्याला भारतीय दंड संहिता (IPC) आणि UAPA कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत दोषी ठरवले आहे.

दरम्यान, शेख अझहर अल इस्लाम सत्तार शेख, मोहम्मद फरहान मोहम्मद रफीक शेख आणि अदनान हसन या तीन भारतीय नागरिकांचा समावेश असलेल्या गुन्हेगारी कटाशी संबंधित हा खटला आहे. हे आरोपी बंदी घातलेली दहशतवादी संघटना, इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (ISIS) चे सदस्य आहेत.

दहशतवादी (Terrorist) हल्ल्यांची योजना आखणे हा या कटाचा उद्देश होता. तसेच, ती योजना पार पाडण्यासाठी तरुणांना आकर्षित करणे, प्रेरित करणे, कट्टरतावादी बनवणे, भरती करणे आणि प्रशिक्षित करणे हे त्यांचे काम होते.

तपासात समोर आले आहे की, आरोपी अदनान हसनने ISIS मध्ये सामील होण्यासाठी तरुणांना प्रेरित करण्यासाठी पोस्ट, वृत्त लेख, व्हिडिओ, फोटो आणि इस्लामिक विद्वानांच्या टिप्पण्यांसह विविध ऑनलाइन प्लॅटफॉर्म आणि पद्धतींचा वापर केला. त्याने आरोपी अब्दुल्ला बासिथ आणि इतर साथीदारांना आर्थिक मदतही केली.

दुसरीकडे, आरोपी अदनान हसनला 29.01.2016 रोजी ISIS शी संबंध आणि भारतात (India) त्याच्या कारवाया केल्याबद्दल अटक करण्यात आली होती. त्यानंतर, पुराव्याच्या आधारे, 25 जुलै 2016 रोजी आरोपी अदनान हसनविरुद्ध UAPA कायदा आणि IPC च्या संबंधित कलमांखाली एनआयए विशेष न्यायालय, नवी दिल्ली येथे आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT