NIA Dainik Gomantak
देश

Terror Funding Case: NIA कडून 13 पाकिस्तानी नागरिकांवर आरोपपत्र; आखत होते दहशत पसरवण्याचा कट

NIA: एनआयएने ज्या 13 पाकिस्तानी नागरिकांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे, त्यापैकी 10 जणांना गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच अटक करण्यात आली होती.

Ashutosh Masgaunde

NIA files Chargesheet against 13 Pakistani People:

नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (NIA) टेरर फंडिंग प्रकरणात १३ पाकिस्तानी नागरिकांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. यातील 10 आरोपींना गेल्या वर्षीच अटक करण्यात आली होती. हे आरोपपत्र दहशतवादी कारवायांसाठी निधी उभारण्यासाठी शस्त्रास्त्रे आणि प्रतिबंधित औषधांच्या तस्करीशी संबंधित प्रकरणात दाखल करण्यात आले आहे.

ही तस्करी पाकिस्तानातून गुजरात किनारपट्टीमार्गे होत असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या १० पाकिस्तानी नागरिकांची नावे कादरबक्ष उमेतान बलोच, अमानुल्ला मूसा बलोच, इस्माईल सब्जल बलोच, अल्लाबक्ष हतार बलोच, गुल मोहम्मद हातर बलोच, अंदम अली बोहर बलोच, अब्दुलगनी जांगिया बलोच, अब्दुलहकीम दिलमुराद बलोच अशी आहेत. या सर्वांना गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अटक करण्यात आली होती.

बोटीतून ड्रग्ज, पिस्तुलसह अनेक गोष्टी जप्त

या दहशतवाद्यांना अटक केली तेव्हा त्यांच्याकडून, एक मासेमारी बोटही जप्त करण्यात आली असून, त्यामधून 40 किलो ड्रग्ज, 6 विदेशी पिस्तूल, 6 मॅगझिन आणि 120 9 एमएम जिवंत काडतुसे सापडली आहेत.

याशिवाय बोटीतून काही कागदपत्रे, पाकिस्तानी ओळखपत्र, मोबाइल फोन आणि पाकिस्तानी चलनही जप्त करण्यात आले आहे. आरोपपत्रात अन्य तीन जणांची नावे असून ते सध्या फरार असल्याचे सांगण्यात येत आहे.

दहशतवादी संघटनांना मदत करणाऱ्यांवर एनआयएची नजर

यापूर्वी असे सांगण्यात येत होते की दहशतवादी संघटनांना मदत करणाऱ्या गटांवर एनआयएची विशेष नजर आहे.

या प्रकरणात एनआयएने नुकतेच अनेक संशयित दहशतवाद्यांच्या तळांवर छापे टाकले होते. माहितीनुसार, त्या दहशतवादी संघटना एनआयएच्या रडारवर आहेत ज्यांचे संबंध लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद, हिजबुल मुजाहिदीन, अल बद्र आणि अल कायदा यांसारख्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांशी जोडलेले असल्याचा संशय आहे.

याप्रकरणी एनआयएने जम्मू-काश्मीरमधील ठिकाणांवर छापे टाकले होते. यासोबतच तरुणांचे ब्रेनवॉश करून त्यांना दहशतीच्या मार्गावर पाठवले जात असल्याचा दावाही एनआयएने केला होता.

अशी झाली कारवाई

पाकिस्तानी तस्कर आणि माफिया हाजी सलीमने गुजरातच्या सागरी मार्गाने अवैध शस्त्रे आणि ड्रग्ज भारतात पाठवण्याचा कट रचला होता. 27-28 डिसेंबर 2022 रोजी गुजरातमधील ओखा जेट्टीपासून 150 नॉटिकल मैलांवर बेकायदेशीर शस्त्रे आणि हेरॉइनची खेप "अल-सोहेली" या मासेमारी बोटीतून येणार असल्याची माहिती एटीएसला मिळाली. ॉ

एटीएस आणि तटरक्षक दलाने संयुक्त कारवाई करून ही बोट ताब्यात घेतली, मार्च 2023 मध्ये गृह मंत्रालयाने हे प्रकरण एनआयएकडे सोपवण्याचा निर्णय घेतला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Edberg Pereira Assault Video: पोलिसांनी लाथा घातल्या, मारहाण केली; परेरा मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज आले समोर, पाहा व्हिडिओ

Edberg Pereira Assault Case: एडबर्ग परेरा मारहाण प्रकरणी निलंबित PSI निलेश वळवईकरांवर गुन्हा दाखल; पुढील तपास सुरु

Sleep Problem: झोपण्यापूर्वीच्या 'या' चुका तुम्हाला बनवत आहेत आजारी! वेळीच व्हा सावध

Poseidon Nuclear Drone: हिरोशिमा बॉम्बपेक्षा 6600 पट शक्तिशाली, पुतिन यांनी जगाला दाखवलं अणुशक्तीवर चालणाऱ्या ड्रोनचं विनाशकारी रुप; अमेरिका-नाटो चिंतेत VIDEO

Watch Video: हाय सायबा!! डोक्यावर धो-धो पाऊस तरीही पालिका इमारतीच्या छतावर चढला कामगार; म्हापशातला गजब प्रकार Viral

SCROLL FOR NEXT