NIA  Dainik Gomantak
देश

Chhattisgarh: नक्षलवादी हल्ल्याप्रकरणी NIA ने 23 जणांविरुद्ध आरोपपत्र केले दाखल

Chhattisgarh: गेल्या वर्षी छत्तीसगडमध्ये झालेल्या नक्षलवादी हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) 23 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे.

दैनिक गोमन्तक

Chhattisgarh: गेल्या वर्षी छत्तीसगडमध्ये झालेल्या नक्षलवादी हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) 23 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. या नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 22 जवान शहीद झाले होते. एनआयएच्या प्रवक्त्याने सांगितले की, हा हल्ला 3 एप्रिल 2021 रोजी बिजापूरच्या ताररेम भागातील टेकलगुडियाम गावाजवळ झाला होता. या हल्ल्यात 35 हून अधिक जण जखमी झाले आहेत.

एनआयएने 5 जून रोजी एफआयआर नोंदवला

या हल्ल्यानंतर ताररेम पोलिस (Police) ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन एनआयएने या वर्षी 5 जून रोजी गुन्हा नोंदवला. तपासादरम्यान, नक्षलवाद्यांनी दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी सीपीआय माओवाद्यांच्या सशस्त्र साथीदारांसह सीआरपीएफ, कोब्रा, डीआरजी आणि राज्य पोलीस कर्मचाऱ्यांवर बॅरल ग्रेनेड लाँचर (बीजीएल) आणि स्वयंचलित शस्त्रांनी हल्ला केला.

हा हल्ला TCOC चा भाग होता

कोब्रा बटालियनचे शिपाई राकेश्‍वर सिंह मन्हास यांचेही नक्षलवाद्यांनी अपहरण करुन त्यांची शस्त्रे लुटल्याचे अधिकार्‍यांच्या वतीने सांगण्यात आले. पोलिस दल आणि सुरक्षा कर्मचार्‍यांवर झालेला हल्ला हा माओवाद्यांच्या टीसीओसी (टॅक्टिकल काउंटर ऑफेन्सिव्ह कॅम्पेन) चा भाग होता, असेही तपासात समोर आले आहे. तपासादरम्यान वरिष्ठ नक्षलवादी नेत्यांची भूमिकाही समोर आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Zilla Panchayat Goa: कामं अर्धवट ठेवणारे कंत्राटदार 'ब्लॅकलिस्ट' होणार! दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीचा कडक इशारा

Bison Attack : दिनेश गावडेवर गव्याकडूनच हल्ला! वन खात्याचा दावा फेटाळला: घटनास्थळाची अधिकाऱ्यांकडून पाहणी

Explainer: उर्जेपासून तंत्रज्ञानापर्यंत... जागतिक पटलावर भारताचा 'मास्टरस्ट्रोक'! 5 देशांच्या दौऱ्यातून PM मोदी साधणार विकासाचं 'पॅकेज'

Goa Police Corruption: पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध लाचखोरीची तक्रार; खोटा गुन्हा दाखल करण्याचाही केला प्रयत्न

West Bengal Animal Slaughter Ban: सुवेंदू अधिकारी सरकारचा मोठा निर्णय! बंगालमध्ये उघड्यावर पशुबळी देण्यावर घातली बंदी; नियमावलीनं उडवली खळबळ

SCROLL FOR NEXT