Viral Video Dainik Gomantak
देश

Viral Video: सायकलचं चाक लावून बाईकला जोडला पलंग, पठ्ठ्यानं झोपून चालवली गाडी; बिहारी तरुणाचा जुगाड तूफान व्हायरल

Jugaad Video Viral: सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हीही 'जुगाड'ला सलाम कराल.

Manish Jadhav

Jugaad Video Viral: आजच्या सोशल मीडियाच्या जगात लोकांना जेव्हा कधी काहीतरी अतरंगी, अनोखे किंवा खास दिसते, तेव्हा ते लगेच आपला फोन काढून तो क्षण कॅमेऱ्यात कैद करतात आणि सोशल मीडियावर पोस्ट करतात. सोशल मीडियावर दररोज असे हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात, जे पाहून लोक आपले मनोरंजन करतात. अनेकदा तर इतके खास आणि युनिक व्हिडिओ दिसतात की पाहणाराही थक्क होतो. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हीही 'जुगाड'ला सलाम कराल.

आधी हा व्हिडिओ पाहा!

व्हिडिओमध्ये काय दिसले?

तुम्ही सोशल मीडियावर अनेकदा लोकांना धोकादायक पद्धतीने बाईक चालवताना पाहिले असेल. अनेक जण आपल्या सोयीसाठी बाईक किंवा स्कूटरला छोटे-मोठे जुगाड लावून फिरतात, पण या पठठ्याने तर जुगाडाची एक वेगळीच लेव्हल गाठली. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसते की, एका बाईकच्या मागील बाजूस सायकलचे दोन चाके जोडलेली आहेत आणि या चाकांवर त्याने थेट खाट लावला आहे. हा तरुण आता त्याच खाटेवर आरामशीरपणे झोपलेला आहे आणि अशा अवस्थेत तो बाईकचे संतुलन सांभाळून गाडी चालवत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना हसू आवरणे कठीण झाले आहे.

या बाईकची नंबर प्लेट बिहारची आहे आणि त्यावर 'बिहारी काहीही करु शकतो' (बिहारी कुछ भी कर सकते हैं) असे लिहिले. हा व्हिडिओ खरोखरच बिहारच्या जुगाडू वृत्तीचे दर्शन घडवतो. हा अजब-गजब व्हिडिओ इंस्टाग्रामवर manish_sharma_5248 नावाच्या अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. 'जीअ जीअ हो बिहार के लाला' असे कॅप्शन त्याला दिले. ही बातमी लिहेपर्यंत, या व्हिडिओला 22 हजारहून अधिक लोकांनी लाईक केले.

यूजर्सच्या मजेशीर प्रतिक्रिया

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूजर्संनी भरभरुन आणि मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत:

  • एका युजरने कमेंट केली, "याला अटॅच वॉशरुम देखील बनवून घ्यायला हवा होता."

  • दुसऱ्या युजरने लिहिले, "ड्रिंक अँड ड्राईव्ह नाही, आता स्लीप अँड ड्राईव्ह (Sleep and Drive)."

  • तिसऱ्या युजरने कमेंट केली, "लहानपणी मी असेच स्वप्न पाहत असे."

हा व्हिडिओ सध्या नेटिझन्सचे भरपूर मनोरंजन करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Omkar Elephant: सावधान! ‘ओंकार हत्ती’ गोव्याच्या सीमेवर; वन खाते पुन्हा सतर्क

Goa Crime: नोकऱ्यांचे आमिष दाखवून महिलांवर अत्याचार! आरोपीचे ‘हवाला कनेक्शन’ उघड; बडे मासे सापडण्याची शक्यता

Goa Mining: खाण क्षेत्र सुधारणांसाठी गोव्याला 400 कोटी! मुख्यमंत्र्यांनी मानले PM मोदींचे आभार; राज्य सरकारच्या प्रयत्नांना बळ

Goa Crime: 'राज्यात गुन्‍हे कमी, चर्चा जास्त'! DGP आलोक कुमार यांचे निरीक्षण; गुन्‍हेगारीसंदर्भातील घटना Viral होत असल्याचा दावा

Vasudev Balwant Phadke: नोकरीला लाथ मारली, अन्यायाविरुद्ध लढा उभारला, इंग्रजांना सळो की पळो केलं, पण फंद फितुरीनं घात केला; वाचा वासुदेव बळवंत फडकेंची संघर्षगाथा!

SCROLL FOR NEXT