Lost Passport Dainik Gomantak
देश

Passports Act: नियमांचे पालन करावेच लागेल, एफआयआर शिवाय हरवलेला पासपोर्ट पुन्हा जारी करणे शक्य नाही: कर्नाटक उच्च न्यायालय

Passports Act: कायद्याच्या कलम 17 नुसार पासपोर्ट ही केंद्र सरकारची मालमत्ता आहे.

Ashutosh Masgaunde

A new passport will not be issued unless an FIR is filed:

पासपोर्ट कायद्यांतर्गत विहित केलेल्या नियमांनुसार, पासपोर्ट हरवल्याबद्दल पोलिसांकडे प्रथम माहिती अहवाल (FIR) नोंदविल्याशिवाय, प्रादेशिक पासपोर्ट अधिकार्‍याला याचिकाकर्त्याचा पुन्हा पासपोर्ट जारी करण्याचे निर्देश देण्याची विनंती करणारी याचिका कर्नाटक उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळली.

श्रीधर कुलकर्णी ए यांची याचिका फेटाळताना न्यायमूर्ती कृष्णा एस दीक्षित यांच्या एकल न्यायाधीशांच्या खंडपीठाने सांगितले की,

परदेशात प्रवास करण्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे. पण तो पासपोर्ट कायदा आणि त्याअंतर्गत तयार केलेल्या नियमांद्वारे नियंत्रित केला जातो. जर कायद्याने एखादी प्रक्रिया लिहून दिली असेल, तर आवश्यक कागदपत्रांसह योग्य अर्ज करून त्याचे पालन करावे लागेल.

पासपोर्ट नियमांमध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, पासपोर्ट किंवा प्रवास दस्तऐवज धारक त्याच्या कागदपत्रांच्या सुरक्षित कस्टडीसाठी वैयक्तिकरित्या जबाबदार आहे. ते जाणूनबुजून खराब किंवा नष्ट केले जाऊ नये.

अनावधानाने नुकसान किंवा हरवल्यास याची माहिती, ताबडतोब भारतातील जवळच्या पासपोर्ट प्राधिकरणाला किंवा (जर पासपोर्ट धारक परदेशात असेल तर) जवळच्या भारतीय मिशनला किंवा स्थानिक पोलीस स्टेशनला कळवावी.

हरवलेल्या पासपोर्टबद्दल नियम

नियमांच्या परिशिष्ट एफ मध्ये हरवलेल्या/नुकसान झालेल्या पासपोर्टच्या बदल्यात पासपोर्ट मिळविण्यासाठी अर्जदाराच्या घोषणेची तरतूद आहे.

अर्जदाराने पासपोर्ट कसा आणि केव्हा हरवला/नुकसान झाला आणि कोणत्या पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर केव्हा दाखल केला आणि किती पासपोर्ट यापूर्वी हरवले/नुकसान झाले हे सांगणे आवश्यक आहे.

याचिकाकर्ता त्याच्या पत्नीने त्याच्याविरुद्ध नोंदवलेल्या गुन्ह्यात आरोपी आहे. त्यांनी असा युक्तिवाद केला की मेनका गांधी विरुद्ध युनियन ऑफ इंडिया (1978) मधील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात प्रवासाचा अधिकार घटनेच्या कलम 21 चा एक भाग म्हणून ओळखला जातो. त्यामुळे प्रादेशिक पासपोर्ट अधिकाऱ्यांनी पासपोर्ट हरवला असल्यास तो नव्याने जारी करावा.

युनियनतर्फे उपस्थित असलेले डेप्युटी सॉलिसिटर जनरल शांती भूषण एच यांनी याचिकेला विरोध करताना म्हटले की,

परदेशात प्रवास करण्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार म्हणून ओळखला गेला असला तरी तो पासपोर्ट कायदा, 1967 च्या तरतुदींद्वारे नियंत्रित केला जातो. कायद्याच्या कलम 17 नुसार पासपोर्ट ही केंद्र सरकारची मालमत्ता आहे.

कोर्टाने पक्षकारांचे म्हणणे ऐकून आणि रेकॉर्डचा अभ्यास करून असे निरिक्षण नोंदवले की, “हे प्रकरण पासपोर्ट जारी करण्याचा नाही तर, हरवलेला पासपोर्ट पुन्हा मिळावा यासाठी आहे. पासपोर्ट नियम नूतनीकरण (पुन्हा जारी) करण्यासाठी देखील पासपोर्ट अर्जासोबत कागदपत्रांचे स्वरूप निर्धारित करतात. त्यासाठी अर्ज आवश्यक कागदपत्रांसह दाखल केलेला नाही.”

यावेळी तातडीने पुन्हा पासपोर्ट जारी करण्याच्या मागणी करणारी याचिका कोर्टाने फेटाळली. जर याचिकाकर्त्याने आवश्यक कागदपत्रे आणि फीसह योग्य अर्ज केला असेल तर त्याला पुन्हा पासपोर्ट जारी करण्याचा कायद्यानुसार विचार केला जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mopa Airport: 'ब्ल्यू कॅब'ला पहिले काउंटर द्या, टॅक्सीवाल्यांची मागणी; काउंटर 15 वर भाडी मिळत नसल्याची तक्रार

National Handloom Day: कुणबी साडीचा सन्मान! मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 'द प्राईड ऑफ गोवन टेक्स्टाईल' प्रदर्शन सुरू

Lumpy Disease: डिचोलीत जनावरांना 'लम्पी'ची लागण, सिकेरीतील गोशाळेत उपचार सुरू

Goa Assembly Live: दाजीच्या टोपीचा विषयही घेता येईल

Goa Doctor: डॉटरांच्या प्रायव्हेट प्रॅक्टिसविषयी राज्यधोरण हवेच!

SCROLL FOR NEXT