New eye drops that could eliminate the need for glasses approved in India Dainik Gomantak
देश

चष्मा आता विसरा! भारतात जादुई 'आय-ड्रॉप'ला मिळाली मंजूरी; कमी दिसणाऱ्यांसाठी संजीवनी

कमकुवत दृष्टी असलेल्या लोकांना यापुढे चष्मा घालण्याची गरज नाहीये. अस्पष्ट दृष्टी असलेल्या आणि चष्म्याशिवाय काहीही वाचू शकत नसलेल्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

Manish Jadhav

कमकुवत दृष्टी असलेल्या लोकांना यापुढे चष्मा घालण्याची गरज नाहीये. अस्पष्ट दृष्टी असलेल्या आणि चष्म्याशिवाय काहीही वाचू शकत नसलेल्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नवीन 'आय ड्रॉप्स'ला भारतात मान्यता देण्यात आलीय. मुंबईस्थित एंटोड फार्मास्युटिकल्सने प्रीस्बायोपिया उपचारासाठी PresVu Eye Drop विकसित केला आहे. प्रिस्बायोपिया नैसर्गिकरित्या वृद्धत्वासह उद्भवते, ज्यामुळे जवळच्या वस्तूंवर लक्ष केंद्रित करण्यात अडचण येते.

सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनच्या (CDSCO) विषय तज्ञ समितीने (SEC) या उत्पादनाची यापूर्वी शिफारस केली होती. त्यानंतर आता ENTOD फार्मास्युटिकल्सला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) कडून अंतिम मंजुरी मिळाली. PresVu हा भारतातील पहिला आय ड्रॉप असल्याचा दावा केला जात आहे, ज्याची रचना प्रेस्बायोपिया असलेल्या लोकांमध्ये चष्मा लावून वाचण्याची गरज कमी करण्यासाठी केली गेली आहे.

ENTOD फार्मास्युटिकल्सला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून अंतिम मान्यता मिळाली. उत्पादकांनी या अनोख्या फॉर्म्युलेशनसाठी आणि त्याच्या उत्पादन प्रक्रियेसाठी पेटंटसाठी अर्ज केला होता. PresVu ची मान्यता नेत्ररोग शास्त्रातील एक मोठे पाऊल मानले जात आहे. ENTOD फार्मास्युटिकल्सचे सीईओ निखिल के मसुरकर यांनी या मान्यतेचे महत्त्व अधोरेखित करताना म्हटले की, "PresVu हे अनेक वर्षांच्या संशोधनाचे फलित आहे. PresVu हे केवळ एक उत्पादन नाही, तर हा एक उपाय आहे जो लाखो लोकांच्या जीवनात प्रकाश टाकेल.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mhadei River: ‘पिण्यासाठी पाणी’ हे कर्नाटकचे नाटक! ‘म्हादई’ तिन्ही राज्यांसाठी महत्त्वाची; कॅप्टन धोंड यांचे प्रतिपादन

School Bag Weight: ..विद्यार्थ्यांचा खांद्यावर दप्तराचे 'वाढते' ओझे! केंद्राच्‍या निर्णयाकडे गोव्याची पाठ; परिपत्रकाला ‘केराची टोपली’

UTAA: गोविंद गावडे, वेळीप यांनी स्वार्थासाठी संघटनेचा वापर केला! शिरोडकरांचा हल्लाबोल; हुकूमशाही कारभाराचा आरोप

Goa Politics: खरी कुजबुज; साडेसहा कोटींच्या मंडपाचा शोध!

Pandharpur Wari: पावलो पंढरी वैकुंठ भुवनी! वैष्णवांचा मेळा डेरेदाखल, 15 लाख भाविकांची मांदियाळी

SCROLL FOR NEXT