Jaipur Murder Case
Jaipur Murder Case Dainik Gomantak
देश

Jaipur Crime: पुतण्याचं काकूसोबत धक्कादायक कृत्य, घटनेन मोठी खळबळ

दैनिक गोमन्तक

श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणानं संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. यातून बाहेर येतच नाही तर आता राजस्थानातील जयपुरमध्येही असाच काहीसा धक्कादायक प्रकार घडला आहे. दिल्लीत हरे क्रिष्णा चळवळीत जायला नकार दिल्याने पुतण्याने आपल्याच काकूची हत्या करून मृतदेहाचे दहा तुकडे करून जंगलात फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे जयपूर शहरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तातडीने आरोपी अनूज शर्माला अटक केली आहे. त्यानंतर आता पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने बी-टेकचं शिक्षण पूर्ण केले आहे. त्याला दिल्लीतील हरे क्रिष्णा चळवळीसाठी जायचे होते. परंतु त्यासाठी काकू सरोज शर्मा यांनी नकार दिला. परिणामी दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर संतापलेल्या आरोपी अनुजनं काकूला शिवीगाळ करत तिची हत्या केली. त्यानंतर आरोपीने काकूच्या मृतदेहाचे करवतीच्या सहाय्यानं दहा तुकडे करत त्याला एका मोठ्या बॅगमध्ये भरले आणि त्यानंतर दिल्लीजवळीत जंगलात फेकून दिले.

त्यानंतर आरोपीने काकू बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत (Police) दाखल केली. याशिवाय मृत सरोज शर्मा यांच्या मुलीनंही पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता त्यांची हत्या करण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले.

पोलिसांनी आरोपी अनुजला अटक केल्यानंतर त्याची चौकशी सुरू केली आहे. आरोपीने ज्या ठिकाणी मृतदेहाचे तुकडे फेकले आहेत, तिथून मृतदेहाचे काही तुकडे जप्त करण्यात आले असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

OCI Issue : ओसीआय प्रकरणी फसवणूक नाही! मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत

Goa Crime News: भागीदारीच्या नावाखाली 35 लाखांचा गंडा तर, पर्वरीत पर्यटकांच्या खोलीत 3 लाखांची चोरी

Goa News : समान नागरी कायदाप्रश्‍नी मोदींकडून गोव्याचे कौतुक

Dabolim Airport: भारतीय नौदलाच्या विमानाचे दाबोळीवर आपत्कालीन लँडिंग, चार फ्लाईट्स वळवल्या

Ponda News : ८४ रोजंदारी कामगारांचा पगार देणार; फोंडा पालिका बैठकीत निर्णय

SCROLL FOR NEXT