देशात कोरोनाचा संसर्ग (Covid 19) आटोक्यात आणण्यासाठी देशभर लसीकरणाच्या (Vaccination) मोहिमेचा प्रारंभ केंद्र सरकारकडून करण्यात आला. या लसीकरण मोहिमेतंर्गत नागरिकांना कोरोना लस देण्यात येवू लागली. मात्र देशात असे अनेक नागरिक आहेत, ज्यांनी अद्याप कोरोना लसीचा पहिला, दुसरा डोस घेतलेला नाही. यातच आता कर्नाटकातील (Karnataka) अनेक भागामध्ये कोरोनाच्या लसीबद्दल (Corona Vaccine) अजूनही अफवा पसरविल्या जात आहेत. त्यामुळे जागरुकतेच्या अभावामुळे नागिक कोरोनाची लस घेण्यास घाबरत आहेत. अशा परिस्थितीत कर्नाटकमधील चामनगर जिल्ह्याचे (Chamnagar district) उपायुक्त एम. आर. रवी (M. R. Ravi) यांनी लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी अनोखा उपक्रम सुरु केला आहे. यावेळी ते म्हणाले की, ज्यांना कोरोना लस अद्याप मिळालेली नाही त्यांना यापुढे राशन मिळणार नाही.
चामराजनगर जिल्हा उपायुक्त एम आर रवी यांनी "ना लसीकरण, ना राशन" या घोषवाक्याने मोहीम सुरू केली आहे. मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात राशन सुविधेचा लाभ घेण्यासाठी, सुमारे 2.9 लाख बीपीएल आणि अंत्योदय कार्डधारकांना अनिवार्यपणे लस घेणे आवश्यक आहे.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्येत पुन्हा वाढ
दुसरीकडे, राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या सोमवारी पुन्हा वाढली. बुधवारी जारी केलेल्या अहवालानुसार, राज्यात मंगळवारी संक्रमणाची 1,217 नवीन रुग्ण आढळले आहेत. दैनंदिन चाचण्यांची संख्या देखील इतर दिवसांपेक्षा 40-50 हजार कमी झाली आहे. नवीन रुग्णसंख्येसह, राज्यातील एकूण बाधितांची संख्या 29,49,445 झाली आहे. नवीन अहवालानुसार, राज्यात 28,93,715 रुग्ण बरे झाले आहेत. त्यापैकी 1,198 लोकांना मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला तर 18,386 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्याच वेळी, राज्यात कोविडमुळे एकूण 37,318 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाने मंगळवारी 25 मृतांची पुष्टी केली.
4,06,865 लोकांनी लसीकरण केले
टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट (टीपीआर) वाढून 0.94 टक्के आणि केस फॅटॅलिटी रेट (सीएफआर) 2.05 टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्यात रिकव्हरी रेट 98.11 टक्के आहे. आरोग्य विभागाने सांगितले की, एका दिवसात 1,28,657 कोविड चाचण्या घेण्यात आल्या आणि 4,06,865 लोकांना लसीकरण करण्यात आले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.