Rahul gandhi Dainik Gomantak
देश

National Herald case : काँग्रेसचे 800 कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांच्याकडून दिल्ली पोलिसांच्या कारवाईचा निषेध

दैनिक गोमन्तक

गेले तीन दिवस नॅशनल हेराल्ड केस प्रकरणावरुन काँग्रेस नेते राहूल गांधी यांची ईडीकडून सलग तिसऱ्या दिवशी चौकशी केली जात आहे. यामुद्यावरुन काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिल्ली पोलिस हे पक्ष कार्यकर्ते आणि नेत्यांवर केलेल्या कारवाईवर जोरदार हल्ला चढवला. यावर दिल्ली पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप फेटाळला आहे. (National Herald case: 800 Congress workers arrested in 3 days )

यावर बोलताना रणदीप सुरजेवाला म्हणाले की, दिल्ली पोलिसांकडून गुंडगिरी केली जात आहे. हे गुन्हेगारी कृत्य आहे. हे खपवून घेतले जाणार नाही आणि त्याचा हिशोब द्यावा लागेल. तसेच आम्ही एफआयआर नोंदवण्याची मागणी करतो. त्याचबरोबर शिस्तभंगाची चौकशी सुरू करावी. आज काँग्रेसच्या सर्व नेत्यांच्यावतीने पत्रकार परिषद घेण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

दिल्ली पोलिस विशेष कायदा आणि सुव्यवस्था डीपी यावर म्हणाले की, तीन दिवसांत सुमारे 800 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच आम्ही काँग्रेसच्या अधिकाऱ्यांना सांगितले होते की, तुम्हाला आंदोलन करायचे असेल तर तुम्ही जंतरमंतरवर जाऊ शकता, परंतु त्यांची मागणी मान्य करण्यात आली नाही. असं ही त्यांनी यावेळी सांगितले. त्यामूळे काँग्रेस कार्यकर्ते आणि नेते हे नेमकं हे प्रकरण किती लांबवणार आहेत. हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.

नॅशनल हेराल्ड प्रकरण काय आहे?

महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरुंच्या काळात स्थापन झालेलं हे वर्तमानपत्र आहे. आणि त्याच्या प्रकाशक कंपनीसाठी आता राहुल, सोनिया यांची चौकशी का होतेय, असं तुम्हाला वाटणं स्वाभाविक आहे.

राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी अध्यक्षपदी असताना काँग्रेस पक्षाचा पैसा नॅशनल हेराल्ड हे वर्तमानपत्र प्रसिद्ध करणारी कंपनी विकत घेण्यासाठी वापरला असा दोघांवरही आरोप आहे.

या बाबतीतले पहिले आरोप भारतीय जनता पार्टीचे तेव्हाचे नेते सुब्रह्मण्याम स्वामी यांनी पहिल्यांदा 2012 मध्ये केले होते. तर गांधी कुटुंबीयांनी कायम कुठल्याही प्रकारच्या आर्थिक अफरातफरीचे आरोप फेटाळले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

SCROLL FOR NEXT