Digital banking transformation in India Dainik Gomantak
देश

Digital Banking: 'पूर्वी फोन बँकिंग, आता घरोघरी डिजिटल बँकिंग'; पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन

Narendra Modi Digital Banking: ‘‘पूर्वी ‘फोन बँकिंग’च्या माध्यमातून केवळ विशिष्ट व्यक्तींना हजारो कोटी रुपयांची कर्जे मिळत होती.

गोमंतक ऑनलाईन टीम

भुवनेश्वर: ‘‘पूर्वी ‘फोन बँकिंग’च्या माध्यमातून केवळ विशिष्ट व्यक्तींना हजारो कोटी रुपयांची कर्जे मिळत होती. मात्र, आज डिजिटल बँकिंगमुळे देशातील प्रत्येक कुटुंबाला आर्थिक सेवांचा लाभ घेता येत आहे. आज प्रत्येक घर डिजिटल बँकिंगचे लाभार्थी आहे,’’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले.

‘डिजिटल इंडिया’ उपक्रमामुळे बँकिंग सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली असून, देशाची बँकिंग व्यवस्था जगातील सर्वांत मजबूत व्यवस्थांमध्ये गणली जात असल्याचेही पंतप्रधान म्हणाले. भुवनेश्वर येथे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) १६९ कोटी रुपये खर्चून नव्याने उभारलेल्या ‘डेटा सेंटर’ आणि सायबर सुरक्षा प्रशिक्षण संस्थेचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते.

देशातील आर्थिक समावेशनाचा उल्लेख करताना मोदी यांनी ‘पंतप्रधान जनधन योजने’अंतर्गत सुमारे ५९ ते ६० कोटी खाती उघडण्यात आल्याचे सांगितले. पूर्वी बँकिंग व्यवस्थेच्या कक्षेबाहेर राहिलेल्या गरीब, मध्यमवर्गीय, लहान शेतकरी, महिला, छोटे व्यावसायिक आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांना आता आर्थिक सेवांचा लाभ घेता येत असल्याचे त्यांनी नमूद केले.

‘फोन बँकिंग’वरून काँग्रेसवर टीका

२०१४ पूर्वी देशात ‘फोन बँकिंग’ची पद्धत प्रचलित होती, असा आरोप मोदी यांनी केला. काँग्रेसशी जवळीक असलेल्या आणि विशिष्ट व्यक्तींना केवळ फोनच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांची कर्जे मिळत होती; दुसरीकडे, सामान्य नागरिकांना बँक खाते उघडण्यासाठीही हमीदाराची गरज भासत होती, असे ते म्हणाले. यामुळेच बँकांच्या ‘एनपीए’चे प्रमाण वाढून बँकिंग व्यवस्था संकटात सापडल्याचा दावाही त्यांनी केला. थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून पाठविलेला संपूर्ण रुपया लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत असल्याचे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान म्हणाले...

देशातील विकासाचा दृष्टिकोन बदलत आहे.

शहरांबरोबरच लहान शहरे, दुर्गम भाग आणि गावांच्या विकासावर सरकारचा भर

अनेक गावांची रस्ते, वीज आणि पाणी यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी प्रतीक्षा आता संपत आहे.

‘डिजिटल बँकिंग’मुळे प्रत्येक कुटुंब या सेवांचे लाभार्थी झाले आहे.

‘डेटा सेंटरचा लाभ देशाला’

भुवनेश्वरमध्ये ‘आरबीआय’च्या डेटा सेंटर आणि सायबर सुरक्षा प्रशिक्षण संस्थेचे उद्घाटन हा देशाच्या संस्थात्मक आणि तांत्रिक क्षमतांच्या बळकटीकरणाच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा असल्याचे नरेंद्र मोदी यांनी सांगितले. या संस्थेचा ओडिशासह संपूर्ण देशाला लाभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

SIR Protest India: 'एसआयआर'विरोधी आंदोलन निर्णायक वळणावर

Goa Politics: 'तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना'; मगो-भाजप युतीत फोंडा-शिरोड्याचा पेच!

Goa Politics: आरजीतील अंतर्गत वाद पुन्हा चिघळला! 'पक्षाला हानी पोहोचवल्यास कारवाई', वीरेश बोरकरांचा खोलकरांना इशारा

'Mumbai Indians'ची नवी रणनीती! प्रशिक्षक बदलल्यानंतर आता कर्णधारपदावरून हार्दिक पांड्याची सुट्टी? रोहित शर्माच्या हाती पुन्हा संघाची कमान; दिग्गजाची मोठी भविष्यवाणी

Rahul Gandhi Accident: राहुल गांधींच्या ताफ्यातील गाड्यांची धडक; पूर्वांचल एक्स्प्रेसवेवर अपघात, अनेक जण जखमी VIDEO

SCROLL FOR NEXT