Oscar 2023 Dainik Gomantak
देश

Oscar 2023: भारताला दोन ऑस्कर मिळाल्यावर PM मोदींचे ट्विट चर्चेत; म्हणाले...

ऑस्कर 2023 या पुरस्कार सोहळ्यात नाटू नाटू या गाण्याला आणि 'द एलिफंट व्हिस्पर्स' या चित्रपटाला ऑस्कर मिळाले.

दैनिक गोमन्तक

Narendra Modi Reaction India Winning Two Oscar Awrds: चित्रपटसृष्टीमध्ये सर्वात मानाचा सजमल्या जाणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याची अनेक कलाकार आतुरतेने वाट पाहत असतात. नुकताच ऑस्कर 2023 हा पुरस्कार सोहळा पार पडला. यंदाचा 95वा ऑस्कर सोहळा लॉस एंजेलिस येथे आयोजित करण्यात आला होता.

या सोहळ्यात भारताला दोन ऑस्कर मिळाले आहेत. बेस्ट डॉक्युमेंट्री शार्ट फिल्म या ऑस्कर पुरस्काराच्या श्रेणीत भारताच्या 'द एलिफंट व्हिस्पर्स'ने बाजी मारली आहे. त्यापाठोपाठ 'आरआरआर' या चित्रपटातील 'नाटू नाटू' गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग या श्रेणीत ऑस्कर पुरस्कार मिळाला. अनेक कलाकारंसह देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे.

पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी 'द एलिफंट व्हिस्पर्स' या चित्रपटाबद्दल बोलताना म्हटले की, 'तुम्हाला हा पुरस्कार मिळाल्याबद्दल द एलिफंट व्हिस्पर्सच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन. तुमचे काम हे नेहमी सर्वांचे लक्ष वेधून घेते.'

पुढे त्यांनी नाटू नाटू गाण्याविषयी बोलताना म्हटले की, 'जगभरात नाटू नाटू हे गाणे लोकप्रिय आहे. पुढील काही वर्षे हे गाणे सर्वांच्या स्मरणात राहील. एमएम कीरवानी आणि संपूर्ण टीमचे अभिनंदन. तुमच्या या यशाने भारताला (India) गौरव मिळवून दिला आहे.'

ऑस्कर 2023' भारतासाठी खास

'ऑस्कर 2023' भारतासाठी खूपच खास आहे. एस.एस राजामौलीच्या 'आरआरआर' सिनेमातील नाटू नाटू गाण्याला ऑस्करसाठी नामांकन मिळालं आहे

ऑस्कर 2023 या पुरस्कार सोहळा लॉस एंजलिसमध्ये आयोजित केलेल्या या 95व्या ऑस्कर सोहळ्याला अनेक कलाकारांनी हजेरी लावली. बॉलिवूडची डिंपल क्विन दीपिका पादूकोणने यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात विशेष स्थान पटकावले आहे. तिचा रेड कार्पेटवरील लूक समोर आला आहे.

ऑस्कर प्रेझेंटर्स म्हणून दीपिका पादूकोणची निवड करण्यात आली होती. दीपिकासोबत रिज अहमद, एमिली ब्लंट, ग्लेन क्लोज, जेनिफर कॉनेली, एरियाना डीबोस, सॅमुअल एल जॅक्सन, ड्वेन जॉनसन, माइकल बी जॉर्डन, ट्रॉय कोत्सुर, जोनाथन मेजर्स, मेलिसा मॅक्कार्थी, जेनेल मोनाए, क्वेस्टलव, जो सलदाना आणि डोनी येन हे प्रेझेंटर्स दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी ऑस्करमध्ये प्रेझेंटर म्हणून दिसणार असल्याची माहिती दीपिकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Banners Goa: म्हापशात 'बॅनर पॉलिटिक्स'चा धुरळा! सत्ताधाऱ्यांचे फलक झळकतात, विरोधकांचे बॅनर रातोरात हटवतात

Most Expensive Iphone 18 Pro: आयफोन 18 प्रो चा लक्झरी अवतार, जगातील सर्वात अलिशान स्मार्टफोन लाँच; 'डार्क रेड' मॉडेलचा नवा जलवा

Goa Crime: पेडणे स्मशानभूमीत अज्ञाताचा कुजलेला मृतदेह! 4-5 दिवसांपूर्वी आणून ठेवल्याचा संशय; खुनाच्या शक्यतेने चतुर्थीत खळबळ

Goa Protests: गोव्यात पाच वर्षांत 42 आंदोलने; 2025 मध्ये सर्वाधिक 15! आंदोलनांशी संबंधित गुन्ह्यांत 2024 आघाडीवर, 7 एफआयआर दाखल

VIDEO: हवेतच विमानाचं टायर फुटलं, इंजिनमध्ये घुसले रबराचे तुकडे अन्..., इराणमध्ये बोइंग 737 चं थरारक इमर्जन्सी लँडिंग; व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT