Priyanka Gandhi  Dainik Gomantak
देश

मोदी देशाचे पंतप्रधान आहेत, आम्ही त्यांची काळजी करतो: प्रियंका गांधी

पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटींनंतर पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत चन्नी म्हणाले होते की, पंजाबमध्ये पंतप्रधान पूर्णपणे सुरक्षित होते.

दैनिक गोमन्तक

पंजाब दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील कुचराईचे प्रकरण थंडावल्याचे दिसत नाही. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांनी पंतप्रधानांच्या सुरक्षेची माहिती प्रियंका गांधी
यांना दिल्यामुळे भाजपने (BJP) नाराजी व्यक्त केली होती. अनेक भाजप नेत्यांनी यावर आक्षेप घेतला होता. (Priyanka Gandhi Latest News)

यानंतर प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी सोमवारी एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत याबाबत स्पष्टीकरण दिले. प्रियांका गांधी म्हणाल्या की, नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. आम्ही त्यांची काळजी करतो. मी सीएम चन्नी यांच्याकडून पीएम मोदींच्या सुरक्षेची माहिती घेतली म्हणून यावर राजकारण होता कामा नये.

पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटींनंतर पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत चन्नी म्हणाले होते की, पंजाबमध्ये पंतप्रधान पूर्णपणे सुरक्षित होते. या संदर्भात मी प्रियंका गांधी यांच्याशी बोललो आहे आणि त्यांना संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. चन्नी यांच्या या वक्तव्यावरून भाजपने काँग्रेस (Congress) आणि मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी चन्नी यांना फटकारले. ते म्हणाले, चन्नी यांनी यासंदर्भात सर्व गोष्टी प्रियंका गांधींना सांगणे दुर्दैवी आहे. यासोबतच प्रियांका गांधी यांना पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत कोणत्या अधिकारात माहिती देण्यात आली, असा सवालही पात्रा यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT