NaMo App New Feature | PM Modi Dainik Gomantak
देश

NaMo App New Feature: आता NaMo App अ‍ॅपमध्येही AI चा वापर.... युजर्सना मिळणार 'ही' सुविधा, पंतप्रधानांसोबत...

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह तुम्हाला फोटो काढायचा असेल तर ही बातमी नक्की वाचा.

दैनिक गोमन्तक

Namo App Gets New Feature: तुम्ही कधी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत फोटो काढला आहे का? तुमचा तो फोटो कुठे हरवला आहे? तर आता काळजी करू नका.

कारण,आता असे फिचर नमो अॅपवर आले आहे, जे एआय तंत्रज्ञानाने सुसज्ज असुन ते तंत्रज्ञान तुमचा तो फोटो शोधण्याचे काम करणार आहे.

कारण नमो अ‍ॅपमध्ये फोटो बूथ नावाचे एक नवीन फीचर अपडेट करण्यात आले आहे. हे फिचर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संबंधित प्रत्येक आठवणी जतन करण्याचे काम करेल आणि सामान्य लोकांशी देखील शेअर करेल.

  • AI तंत्रज्ञानाने सुसज्ज नमो अ‍ॅप

एका अधिकाऱ्याने सांगितले की, नमो अ‍ॅप आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. ज्यामध्ये त्या व्यक्तीचा फोटो स्कॅन करून तो पंतप्रधानांसोबतचा फोटो तुमच्यासमोर डेटाबेसमध्ये ठेवतो.

अधिकाऱ्याने सांगितले की, आतापर्यंत फक्त खासदार, आमदारांसारखे लोकच पंतप्रधान मोदींसोबत त्यांचा फोटो लावू शकत होते.

पण आता केव्हाही पंतप्रधानांसोबत क्लिक झालेल्या सामान्य माणसाचे फोटो या तंत्रज्ञानाच्या आधारे शोधु शकतो. एवढेच नाही तर नमो अॅपवर तुमचा उपस्थित असलेला फोटोही डाउनलोड करू शकता.

  • बऱ्याच काळापासुन कार्य सुरु होते

पीएम मोदींशी संबंधित या अॅपवर एक टीम बराच काळापासुन काम करत होती. सुरुवातीला नमो अॅपवर फक्त 30 दिवसांत क्लिक केलेले फोटोच उपलब्ध होते. पण आता जुने फोटोही अॅपवर उपलब्ध असतील.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नमो अॅप हे पहिलेच प्लॅटफॉर्म आहे, जे अशा तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकदा सांगितले होते की, त्यांनी सुरुवातीपासून तंत्रज्ञानाचा वापर केला नसला तरी प्रत्येक नवीन गोष्ट शिकली पाहिजे.

ते स्वतःही तंत्रज्ञानाचा वापर करायला शिकतात. पीएम मोदींनी खासदारांना तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा सल्लाही दिला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबूज: खोलकरही नांगी टाकणार?

Sheikh Hasina Press Conference: 'मी जेल आणि मृत्यूला घाबरत नाही!', शेख हसीना यांचा मायदेशी परतण्याचा थेट इशारा; भारतातील पत्रकार परिषदेने उडवली खळबळ

Goa Politics: 'आरजी'कडून निलंबित खोलकरांना चौकशीसाठी नोटीस; 7 ऑगस्‍टला हजर राहण्‍याचे निर्देश

Accident Death: भीषण अपघात! माशेल येथे जीपची दुचाकीला जोरदार धडक; सावंतवाडीतील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Goa Apostille Process: परदेशात जाणाऱ्या गोवेकरांसाठी खूशखबर! कागदपत्रांच्या पडताळणीची प्रक्रिया झाली सुलभ; सरकारकडून 'SOP' जाहीर

SCROLL FOR NEXT