Tow days Police for Accused in Delhi murder case. Dainik Gomantak.
देश

Delhi Murder Case : दिल्ली हत्या प्रकरणातील नराधमाला दोन दिवसांची पोलीस कोठडी

Crime News: रविवारी रात्री साहिलने एका मुलीची चाकूने भोसकून खून केला. यावेळी साहिलने मुलीच्या डोके दगडाने 6 वेळा ठेचले.

गोमन्तक डिजिटल टीम

Shahbad Dairy murder case 

दिल्लीत १६ वर्षीय मुलीची चाकूने भोसकून हत्या करणाऱ्या साहिलला आज (मंगळवारी) साकेत न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने साहिलला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. रविवारी रात्री साहिलने एका मुलीची चाकूने भोसकून खून केला. यावेळी साहिलने मुलीच्या डोक्यात दगडाने 6 वार केले. त्यानंतर तो बुलंदशहर येथे मावशीच्या घरी जाऊन लपला. तेथून पोलिसांनी त्याला अटक केली.

दिल्ली पोलिसांच्या सूत्राने सांगितले की, मुलीची हत्या केल्यानंतर आरोपी साहिल रिठाला येथे गेला आणि तेथे तो शस्त्र फेकून बसने बुलंदशहर येथे आपल्या मावशीच्या घरी गेला. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. बुलंदशहरला जाण्यासाठी साहिलने दोन बस बदलल्या होत्या. पोलिसांच्या काही प्रश्नांची उत्तरे तो देऊ शकलेला नाही. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी तो असे करत असावा. त्याला चौकशीसाठी कोठडीत घेण्यात येणार आहे. घटनेच्या 10 मिनिटांनंतर स्थानिकांनी माहिती दिली असता पोलीस घटनास्थळी पोहोचले.

जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

राजधानी दिल्लीतील शाहबाद डेअरी परिसरात रविवारी रात्री 16 वर्षीय अल्पवयीन मुलीची तिच्या प्रियकराने भोसकून हत्या केली. २० वर्षीय साहिल असे आरोपीचे नाव आहे. तसेच त्याला पोलिसांनी बुलंदशहर परिसरातून अटक केली आहे. साहिल आणि या मुलीचे प्रेमसंबंध असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र रविवारी त्यांच्यात भांडण झाले. पीडित मुलगी तिच्या मैत्रिणीच्या मुलाच्या वाढदिवसाला घरून निघाली होती. मात्र त्याचवेळी आरोपी साहिलने तीच्यावर चाकूने हल्ला केला. एक-दोनदा नव्हे तर या नराधमाने 21 वेळा चाकूने हल्ला केला आणि नंतर दगडाने डोके ठेचले.

फाशीची मागणी केली

मुलीचा मारेकरी साहिलला फाशी द्यावी, अशी मागणी मृताच्या पालकांनी केली आहे. पीडितेच्या वडिलांनी सांगितले की, माझ्या मुलीची प्रकृती खूपच वाईट होती. मला साहिलबद्दल काहीच माहीत नव्हते. त्यांच्यामध्ये काय होते? काल चौकशी दरम्यान मला कळले. माझ्या मुलीचा स्वभाव चांगला होता. त्याने माझ्या मुलीला ज्या पद्धतीने मारले आहे, त्याला कठोरात कठोर शिक्षा द्यावी, जेणेकरून पुन्हा असे कोणी करू नये, अशी माझी मागणी आहे.  

या आरोपीचे नाव साहिल असून तो फ्रीज आणि एसी दुरुस्त करण्याचे काम करतो. साहिलने रविवारी रात्री आपल्या 16 वर्षीय मैत्रिणीची हत्या केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. साहिलने एका-दोनदा नव्हे तर 21 वेळा अल्पवयीन मुलावर चाकूने कसा हल्ला केला हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहे. एवढेच नाही तर मनाचे समाधान न झाल्याने त्याने एक-दोनदा नव्हे तर सहा वेळा शेजारी ठेवलेल्या दगडाने डोके ठेचले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT