Mukul Rohatgi Twitter
देश

Modi Government मुकूल रोहतगींवर सोपविणार मोठी जबाबदारी: पुन्हा भारताचे AG होण्याची शक्यता

ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी पुन्हा एकदा भारताचे अ‍ॅटर्नी जनरल बनू शकतात. रोहतगी हे 2014 ते 2017 या काळात देशाचे अ‍ॅटर्नी जनरलही होते.

दैनिक गोमन्तक

Mukul Rohatgi to Become Attorney General: ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी पुन्हा एकदा भारताचे अ‍ॅटर्नी जनरल बनू शकतात. रोहतगी हे 2014 ते 2017 या काळात देशाचे अ‍ॅटर्नी जनरलही होते. विद्यमान अ‍ॅटर्नी जनरल केके वेणुगोपाल यांचा कार्यकाळ 30 सप्टेंबर रोजी संपत आहे. 91 वर्षीय वेणुगोपाल आता या पदावर राहण्यास इच्छुक नसल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रोहतगी यांच्याबाबतची ही माहिती समोर आली आहे. रोहतगी यांच्या नियुक्तीची अधिकृत अधिसूचना अद्याप जारी करण्यात आलेली नाही.

रोहतगी 1 ऑक्टोबरपासून एजी म्हणून त्यांचा दुसरा कार्यकाळ सुरू करू शकतात. पंतप्रधान कार्यालयाने केलेल्या विनंतीनंतर रोहतगी यांनी हे पद स्वीकारण्यास होकार दिला आहे. ते सध्याचे एजी केके वेणुगोपाल यांची जागा घेतील. असे मतही तज्ञांनी व्यक्त केले आहे.

AAP साठी BTP ला किती मोठा धक्का

रोहतगी यांच्यानंतर 15 जुलै 2017 रोजी वेणुगोपाल यांना एजीची जबाबदारी देण्यात आली होती. यासोबतच त्यांना त्यांच्या कार्यकाळात तीन वेळा मुदतवाढही देण्यात आली होती. नुकत्याच झालेल्या सुनावणीदरम्यान, त्यांनी सूचित केले होते की, सध्याचा कार्यकाळ संपल्यानंतर ते एजी म्हणून आपला प्रवास सुरू ठेवणार नाही. 2020 मध्ये, त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतरही, त्यांनी पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती, परंतु केंद्र सरकारने त्यांना एजी म्हणून कायम राहण्याची विनंती केली होती.

रोहतगींसोबत सरकारची चर्चा सुरूच

रोहतगी यांनी 2017 मध्ये कार्यालय सोडल्यानंतरही, सरकार कलम 370 रद्द करण्यासह अनेक मुद्द्यांवर चर्चा करत आहे. भारतातील हायप्रोफाइल वकीलांपैकी एक असलेल्या रोहतगी यांनी गुजरात दंगलीसारखे अनेक मोठे खटले लढवले आहेत. त्यावेळी त्यांनी न्यायालयात गुजरात सरकारची बाजू मांडली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: खासदार विरियातो, प्रदेशाध्यक्ष पाटकर पोलिसांच्या ताब्यात; काँग्रेसचे कॅश फॉर जॉब विरोधात आंदोलन

IFFI Goa 2024: "आलीयाच्या सुरक्षेसाठी मी त्याला हाकललं होतं" काही तासांतच 'ते' विधान फिरवल्याने इम्तियाज अली वादाच्या भोवऱ्यात

Goa Today's News Live: कळंगुटमध्ये रस्त्यावर नग्न होऊन राडा करणाऱ्या UP च्या पर्यटकाला अटक

National Cashew Day: गोव्यात काजूचे पीक घेणे का बनत आहे कठीण? कारणे जाणून घ्या..

Goa Bench: निवृत्त कर्मचारी सेवा नियमांत बदल; निवृत्तीवेतनाची थकबाकी देण्यास एक वर्षाची मुदत

SCROLL FOR NEXT