MLA Abbas Ansari Dainik Gomantak
देश

माफियाच्या आमदार मुलाला High Court ने दिला मोठा झटका, अटकपूर्व जामीन फेटाळला

MLA Abbas Ansari: माफिया मुख्तार अन्सारीचा मुलगा आमदार अब्बास अन्सारी याला अटकपूर्व जामीन देण्यास उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने नकार दिला आहे.

दैनिक गोमन्तक

MLA Abbas Ansari: माफिया मुख्तार अन्सारीचा मुलगा आमदार अब्बास अन्सारी याला अटकपूर्व जामीन देण्यास उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने नकार दिला आहे. न्यायालयाने अब्बास अन्सारीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळताना सांगितले की, 'आरोपींकडून शस्त्रे आणि मोठ्या प्रमाणात काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ते शूटिंग स्पोर्ट्ससाठी नव्हती'

दरम्यान, शूटिंग स्पोर्ट्समध्ये आरोपींकडून (Accused) जप्त करण्यात आलेली शस्त्रे आणि काडतुसे प्रतिबंधित असल्याचे न्यायालयाने पुढे सांगितले. 26 ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता. विशेष म्हणजे, अब्बास अन्सारी हा शस्त्र परवान्यातील खोट्या प्रकरणात वॉन्टेड आहे.

तसेच, मुख्तार अन्सारीचा मुलगा आणि आमदार अब्बास अन्सारी याने शस्त्र परवाना बनावट प्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयाच्या (High Court) लखनौ खंडपीठात अर्ज केला होता. याआधी गुरुवारी, न्यायालयाचे विशेष एसीजेएम अंबरीश कुमार श्रीवास्तव यांनी अब्बासला फरार घोषित केले होते. तसेच आयपीसीच्या कलम 82 अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाने पुढील सुनावणीसाठी 26 सप्टेंबरची तारीख निश्चित केली आहे.

शिवाय, महानगर निरीक्षक के.के.तिवारी यांनी आपल्या अहवालासह दुसऱ्यांदा न्यायालयासमोर अब्बासला फरार घोषित करण्याची मागणी करणारा अर्ज वरिष्ठ अभियोजन अधिकारी अवधेश सिंग यांच्यामार्फत दिला होता. त्यात पोलिसांनी म्हटले होते की, 'अब्बास अन्सारीविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला शोधण्यासाठी उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि इतर राज्यांमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकले. यापैकी एकाही ठिकाणी अब्बास किंवा त्याच्या कुटुंबातील कोणताही सदस्य आढळून आला नाही.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT