MP Viral Video Dainik Gomantak
देश

Watch Video : 'कुत्ते की तरह भौंक'! गळ्यात पट्टा बांधून भूंकायला लावले; धक्कादायक प्रकाराने मध्य प्रदेश हादरले

या प्रकरणी तीन आरोपींविरुद्ध कठोर असा राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA) लागू करण्यात आला आहे.

Ashutosh Masgaunde

एका व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये एका तरुणाचा छळ आणि मारहाण करण्यात आल्याचे दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, हल्लेखोर मुलाला कुत्र्यासारखे भुंकण्यास सांगत आहेत आणि त्याच्या गळ्यात पट्टा बांधला आहे.

एका वापरकर्त्याने ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला असून, “फैजान, बिलाल, समीर, मुफिद आणि साहिल यांनी भोपाळमध्ये एका हिंदू मुलाला विजयला बेदम मारहाण केली, त्याच्या गळ्यात बेल्ट बांधला आणि त्याला कुत्र्यासारखे भुंकायला भाग पाडले, तसेच त्याच्या बहिणीवर बलात्कार करण्याची आणि त्याच्या आईलाही शिवीगाळ करण्याची धमकी दिली.

व्हायरल झालेल्या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले की, भोपाळ पोलिस आयुक्तांना 24 तासांच्या आत कारवाई करण्याचे आणि घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेला दु:खद म्हणत मिश्रा म्हणाले की, एखाद्या व्यक्तीशी असे वागणे अत्यंत निषेधार्ह आहे.

नरोत्तम मिश्रा म्हणाले, "मी तो व्हिडिओ पाहिला. मला वाटले की ही एक गंभीर घटना आहे. एखाद्या व्यक्तीशी असे वागणे अत्यंत निषेधार्ह आहे. मी भोपाळ पोलिस आयुक्तांना या घटनेची चौकशी करून २४ तासांत कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत."

या घटनेतील पिडित तरुण विजय रामचंदानी याने दिलेल्या तक्रारीनुसार, या प्रकरणी तीन मुस्लिम तरुणांविरुद्ध कठोर असा राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA) लागू करण्यात आला आहे.

यावेळी तक्रारदाराला इस्लाममध्ये धर्मपरिवर्तन करण्यासाठी जबरदस्ती केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीच्या आधारे समीर, साजिद आणि फैजान लाल या तिघांना अटक करण्यात आली आहे.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA) अंतर्गत आरोपींची घरे पाडण्याचे निर्देश दिले आहेत. याद्वारे त्यांना 12 महिन्यांपर्यंत शिक्षा होईल. तसेच नवे पुरावे मिळाल्यास शिक्षा आणखी वाढेल.

काँग्रेसचा भाजपवर निशाणा

विशेष म्हणजे याप्रकरणी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश शर्मा यांचे वक्तव्यही समोर आले आहे. ते म्हणाले की, मध्य प्रदेशात गुंडगिरी प्रस्थापित झाली आहे. राजधानी भोपाळमध्ये एका निष्पाप मुलाचा व्हिडिओ ज्या प्रकारे व्हायरल होत आहे, ते पाहता मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांचे राज्य सुरक्षित असल्याचा दावा केवळ पोकळ आश्वासन आहे.

वादाचे कारण

पीडित विजयची फैजान, समीर आणि साहिल यांच्यासह इतर आरोपींशी मैत्री होती. सर्वजण मिळून खाणेपिणे करायचे. फैजानने विजयवर धर्मावरुन टीका केली. विजयने याला विरोध केला. त्यामुळे त्याचा आरोपींसोबत वाद झाला. ९ जूनच्या रात्री आरोपींनी त्याला पकडून त्याच्या गळ्यात पट्टा घालून बेदम मारहाण केली. यासोबतच धर्म परिवर्तनासाठी दबावही निर्माण करण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

Cuncolim IDC: कुंकळ्ळी औद्योगिकमध्ये ओंगळवाणी परिस्‍थिती! कर्मचारी राहतात तेथेच करतात आंघोळ; निरीक्षकांनी केली पाहणी

Goa Live Updates: सरकारी नोकरी घोटाळ्यात भाजपचे नेते गुंतलेत; अमित पालेकरांचा हल्लाबोल!

Goa Post Office: गोव्यात पोस्टाची सेवा ठप्प! देशभरातील इंटरनेट सेवेत बिघाड; बॅंकिंग सेवेला मोठा फटका

Bhutani Project: ‘त्‍या’ तिघांना अटक करा! सांकवाळच्या तीस महिलांसोबत कुतिन्हो यांची मागणी

SCROLL FOR NEXT