Coronavirus in World Dainik Gomantak
देश

Corona Virus in World: कोरोनामुळे एका महिन्यात 25 हजारांहून अधिकांनी गमावला जीव , WHO ने जारी केले...

भारतासह जगभरात पुन्हा एकदा कोरोना विषाणूने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे.

दैनिक गोमन्तक

Coronavirus in World: भारतासह जगभरात पुन्हा एकदा कोरोना विषाणूने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, गेल्या एका महिन्यात जगभरात कोरोनामुळे 25 हजारांहून अधिकांनी जीव गमावला आहे. तर सुमारे 4 दशलक्ष नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

डब्ल्यूएचओच्या टेक्निकल लीड विभागाच्या डॉ. मारिया व्हॅन यांनी सांगितले की, कोविडचे नवे व्हॅरियंट जगभरात सातत्याने येत आहेत.

आतापर्यंत 800 हून अधिक व्हेरियंट सापडली आहेत. कोरोनाची प्रकरणे सातत्याने समोर येत आहेत आणि या विषाणूमुळे मृत्यूही होत आहेत. कारोनाचा वाढता धोका लक्षात घेता WHO ने सर्व देशांना कोविडबाबत सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.

दुसरीकडे, व्हायरसमधील म्युटेशन भारतातही सुरू आहे आणि आता Omicron चे XBB.1.16 प्रकार नोंदवले गेले आहे. हा प्रकार इतर अनेक देशांमध्येही पसरत आहे. त्यामुळे जगभरात कोरोनाचे प्रकरणे वाढत आहेत.

अशा परिस्थितीत सर्व देशांना कोरोना संदर्भात चाचणी आणि देखरेख वाढवावी लागेल. नवीन व्हॅरियंट ओळखण्यासाठी जीनोम सिक्वेन्सिंग देखील वाढवणे आवश्यक आहे. तसेच ही दिलासा देणारी बाब आहे की

नवीन प्रकाराची लक्षणे सामान्य फ्लू सारखीच आहेत. यामुळे, ऑक्सिजनची पातळी कमी झाल्याची कोणतीही प्रकरणे नाहीत. वृद्ध आणि आजारी असलेल्या रुग्णांमध्ये संसर्ग होत आहे.

या व्हॅरियंटपासुन लोकांनी संरक्षण करणे आवश्यक आहे. भारतात झपाट्याने पसरत असलेला नवीन व्हॅरियंट Omicron चे xbb.1.16 प्रकार भारतात वेगाने पसरत आहे. आतापर्यंत या व्हॅरियंटची 600 हून अधिक प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत.

नवीन प्रकार महाराष्ट्र, दिल्ली, केरळसह अनेक राज्यांमध्ये पसरत आहे.तज्ञांचे म्हणणे आहे की नवीन प्रकार हे देशातील कोरोना प्रकरणांमध्ये वाढ होण्याचे कारण आहे. कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना बाधा होण्याची अधिक शक्यता आहे.

कोरोना तज्ञ डॉ जुगल किशोर म्हणतात की लोकांच्या दुर्लक्षामुळे कोरोनाला पसरण्याची संधी मिळत आहे. लोक मास्क घालत नाहीत आणि गर्दीच्या ठिकाणीही कोरोना प्रोटोकॉल पाळला जात नाही, त्यामुळे प्रकरणे वाढत आहेत.

दरम्यान, अजुन काही दिवस प्रकरणे वाढू शकतात, असे तज्ञांचे म्हणणे आहे. कोरोनाची प्रकरणे काही दिवस वाढू शकतात. विषाणूचा उच्चांक अद्याप यायचा आहे. परंतु वाढत्या प्रकरणांमुळे घाबरण्याचे कारण नाही. रुग्णांची संख्या वाढत असली तरी विषाणूमुळे मृत्यूची प्रकरणे समोर येत नाहीत.

लोकांना कोरोनाबद्दल निष्काळजीपणा न बाळगण्याचा आणि या विषाणूला रोखण्यासाठी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचा सल्ला दिला जात असला तरी दिल्ली कोरोना: सक्रिय प्रकरणांमध्ये 15 दिवसांत सात पट वाढ झाली आहे असी माहिती एम्सच्या डॉक्टरांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT