देश

IND vs ENG: विकेट मिळाली, पण एक चूक झाली! प्रसिद्ध कृष्णाचा विकेटचा आनंद क्षणातच मावळला; काय झालं नेमकं? पाहा व्हिडिओ

Mohammed Siraj Harry Brook: मोहम्मद सिराजच्या एका चुकीमुळे इंग्लंडच्या हॅरी ब्रूकला जीवदान मिळाले.

Manish Jadhav

Mohammed Siraj Harry Brook: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ओव्हल कसोटी सामन्यात (Oval Test Match) भारताने इंग्लंडसमोर 374 धावांचे मोठे आव्हान ठेवले आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल करताना भारताला एक महत्त्वाची विकेट मिळण्याची संधी होती, पण मोहम्मद सिराजच्या (Mohammed Siraj) एका चुकीमुळे इंग्लंडच्या हॅरी ब्रूकला (Harry Brook) जीवदान मिळाले. यामुळे विजयाचा जल्लोष करत असलेले भारतीय खेळाडू काही क्षणातच निराश झाले.

प्रसिद्ध कृष्णाने विकेट घेतली, पण...

  • इंग्लंडच्या दुसऱ्या डावातील 35व्या षटकात प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna) गोलंदाजी करत होता. त्याच्या पहिल्याच चेंडूवर हॅरी ब्रूकने शॉट मारला आणि चेंडू बॅटच्या वरच्या भागाला लागून हवेत उडाला.

  • बाउंड्रीजवळ (Boundary) उभ्या असलेल्या मोहम्मद सिराजने चेंडूचा वेध घेऊन तो पकडला. विकेट मिळाल्याचा आनंदात प्रसिद्ध कृष्णा आणि इतर खेळाडूंनी जल्लोष करण्यास सुरुवात केली.

  • पण त्याचवेळी, चेंडू पकडताना सिराजचा तोल गेला आणि त्याचा पाय बाउंड्री लाईनला (Boundary Line) लागला. त्यामुळे, अम्पायरने ब्रूकला 'सिक्सर' (Six) दिला आणि तो आऊट झाला नाही.

या घटनेमुळे सिराजही खूप निराश झाला. एकाच क्षणात विजयाचा आनंद दुःखात बदलला आणि प्रसिद्ध कृष्णाच्या चेहऱ्यावरील हास्यही गायब झाले.

इंग्लंडच्या फलंदाजांची दमदार कामगिरी

दरम्यान, या जीवनादानानंतर हॅरी ब्रूकने धडाकेबाज फलंदाजी सुरुच ठेवली. त्याने 54 चेंडूत 62 धावा केल्या, दुसऱ्या बाजूला अनुभवी फलंदाज जो रुट (Joe Root) 40 धावांवर खेळत आहे. याआधी, सलामीवीर बेन डकेटने (Ben Duckett) 54 आणि कर्णधार ओली पोप (Ollie Pope) याने 27 धावा करुन इंग्लंडला चांगली सुरुवात दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT