PM Modi with Soldiers  Dainik Gomantak
देश

PM Narendra Modi: यंदाची दिवाळीही मोदी सीमेवरील जवानांसोबत साजरी करणार

पंतप्रधान झाल्यापासूनची परंपरा; उत्तराखंडातील माणा गावाला देणारा व्हायब्रंट व्हिलेजचा दर्जा

गोमन्तक डिजिटल टीम

PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दरवर्षीप्रमाणे यंदाची दिवाळीही सीमेवरील जवानांसमवेत साजरी करणार आहेत. पंतप्रधान झाल्यापासून गेल्या 8 वर्षात पंतप्रधान मोदींनी प्रत्येक दिवाळी सीमेवरील जवानांसमवेत साजरी केली आहे. यंदा 24 ऑक्टोबर हा दिवाळीची मुख्य दिवस आहे. या दिवशी मोदी दरवर्षीप्रमाणे सीमेवरील जवानांसमवेत दिवाळी साजरी करतील.

दिवाळीपुर्वी मोदी देशातील धार्मिक स्थळांचा दौरा करणार आहेत. पंतप्रधान मोदी 21 ऑक्टोबर रोजी केदारनाथाचे दर्शन घेतील. त्या रात्री त्यांचा मुक्काम तिथेच असेल. त्यानंतर 22 ऑक्टोबर रोजी ते बद्रीनाथाचे दर्शन घेतील. 23 ऑक्टोबर रोजी मोदी अयोध्येला जाणार आहेत. तिथे ते रामलल्लाचे दर्शन घेतील. पुजा करतील.

त्यानंतर सायंकाळी दिवाळीच्या पुर्वसंध्येला शरयू नदीच्या किनारी दीपोत्सवात भाग घेतील. शरयू नदीच्या किनारी होणारा हा दीपोत्सम भव्य असतो. यंदा या घाटावर 17 लाख पणत्या प्रज्वलित केल्या जाण्याची शक्यता आहे. असे झाल्यास तो विक्रम ठरेल.

याच काळात ते उत्तराखंडमधील माणा या गावात जातील. येथे ग्रामस्थ आणि जवानांशी संवाद साधतील. या गावाला पंतप्रधान मोदी व्हायब्रंट व्हिलेज हा दर्जा देणार आहेत. चमोली जिल्ह्यातील माणा हे गाव भारत-तिबेट सीमेवर आहे. हे गाव गरम कपड्यांसाठी प्रसिद्ध आहे. हे गाव समुद्रसपाटीपासून 18 हजार फुट उंचीवर आहे.

केंद्र सरकारचे गृह मंत्रालय, संरक्षण मंत्रालय आणि सैन्य दल तसेच स्थानिक प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नांतून चीन सीमेवरील गावांचा विकास केला जात आहे. या गावाचाही त्यात समावेश आहे. मोदींच्या या गावाला भेटीतून चीनला योग्य तो संदेश देण्याची सरकारची योजना आहे. माणा गावात एक चहाचे दुकान आहे. त्याच्या बोर्डवर भारतातील अखेरचे चहाचे दुकान, असे लिहिले आहे. या गावात रस्ता संपतो, पुढे कुठलाही रस्ता नाही. थेट तिबेटची सीमा सुरू होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT