Meghalaya CMO Dainik Gomantak
देश

Attack on Meghalaya CM: मुख्यमंत्री संगमा यांच्या कार्यालयावर जमावाकडून हल्ला, 5 सुरक्षा कर्मचारी जखमी

Meghalaya CM Conrad Sangma: मेघालयामधून एक मोठी बातमी समोर येत आहे. तुरा येथे जमावाने मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयावर दगडफेक केली.

Manish Jadhav

Meghalaya CM Conrad Sangma: मेघालयामधून एक मोठी बातमी समोर येत आहे. तुरा येथे जमावाने मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयावर दगडफेक केली. ज्यात पाच सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा सुरक्षित आहेत. मात्र, ते अजूनही तुरा येथील त्यांच्या कार्यालयातच आहेत. शेकडो लोकांनी त्यांच्या कार्यालयाला घेराव घातला.

वास्तविक, गारो हिल्स-आधारित नागरी समाज गट तुरा येथे हिवाळी राजधानीच्या मागणीसाठी आंदोलन करत आहे. सायंकाळी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर शेकडो लोकांनी जमा होऊन दगडफेक सुरु केल्याने वातावरण तणावपूर्ण झाले. या हल्ल्यात पाच सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यांना मुख्यमंत्री संगमा यांच्या कार्यालयात आणण्यात आले.

संगमा जखमींची काळजी घेताना दिसले

दुसरीकडे, या घटनेचे फोटोही समोर आले आहेत, ज्यामध्ये सुरक्षा कर्मचारी जखमी अवस्थेत जमिनीवर पडलेले दिसत आहेत. आंदोलकांनी रास्ता रोको केल्याने मुख्यमंत्री अद्याप कार्यालयातून बाहेर पडू शकलेले नाहीत, असे सांगण्यात आले.

दरम्यान, मुख्यमंत्री संगमा जखमी सुरक्षा कर्मचाऱ्यांची काळजी घेताना दिसले. सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी तणाव कायम असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे. मुख्यमंत्री संगमा आंदोलकांशी बोलत होते, मात्र त्यादरम्यान त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली.

मुख्यमंत्री आंदोलकांशी बोलत होते, त्यानंतर दगडफेक झाली

जमावातील काही लोकांनी दगडफेक सुरु केली तेव्हा संगमा आंदोलकांशी बोलत होते. तुरा येथे हिवाळी राजधानीची मागणी करणाऱ्या नागरी समाज गटांमध्ये ACHIK आणि GHSMC यांचा समावेश आहे.

वाद कसा सुरु झाला?

वास्तविक, सोमवारी सायंकाळपासूनच मुख्यमंत्री कार्यालयाबाहेर शेकडो लोकांचा जमाव जमू लागल्याने वादाला सुरुवात झाली. सुरुवातीला जमावाने घोषणाबाजी करत आपल्या मागण्या मांडल्या. मात्र काही वेळातच जमावाने त्याचे रुप पालटले आणि त्यानंतर कार्यालयावर दगडफेक सुरु केली.

यावेळी कार्यालयाच्या सुरक्षेसाठी बाहेर तैनात असलेले पाच सुरक्षा कर्मचारी जखमी झाले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करता यावेत म्हणून त्यांना तातडीने कार्यालयात आणण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT