Mirchi Baba Dainik Gomantak
देश

Mirchi Baba: बलात्कारप्रकरणी मिर्ची बाबा गजाआड, 'पूजेच्या बहाण्याने...'

Bhopal Police: ग्वाल्हेर गुन्हे शाखेच्या पथकाने बाबाला हॉटेलमधून अटक केली.

दैनिक गोमन्तक

Kamal Nath Govt: कमलनाथ सरकारमध्ये मंत्री असलेले वैराग्य नंद गिरी महाराज उर्फ ​​मिर्ची बाबा याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी भोपाळ पोलिसांचे एक पथक ग्वाल्हेरला पोहोचले, जिथे ग्वाल्हेर क्राइम ब्रॅंचच्या मदतीने बाबाला हॉटेलमधून अटक केली. भोपाळ पोलिसांचे पथक मिर्ची बाबाला अटक करुन तेथून घेऊन गेले. भोपाळच्या पोलिस ठाण्यात मिर्ची बाबावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, पिडीत महिलेने (Woman) आरोप केला होता की, 'मिर्चीने मूल होण्याच्या बहाण्याने मला नशेच्या गोळ्या खाण्यास दिल्या. त्यानंतर बलात्कार केला.' यासंदर्भात भोपाळचे (Bhopal) पोलिस पथक आरोपी मिर्ची बाबाला अटक करण्यासाठी काल रात्री ग्वाल्हेरला (Gwalior) पोहोचले होते. जिथे बाबाला आज सकाळी एका हॉटेलमधून अटक करण्यात आली.

दुसरीकडे, पीडित महिला रायसेन येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. तिचे लग्न होऊन चार वर्षे झाली असल्याचे तिने फिर्यादीत पोलिसांना सांगितले आहे. तिला मुलबाळ नाही, ती निपुत्रिक आहे, म्हणून मिर्ची बाबांच्या संपर्कात आली. बाबाने पूजा करुन अपत्यप्राप्तीचा दावा केला. उपचाराच्या नावाखाली बोलावून गोळ्या खाऊ घालून बलात्कार केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

टी-20, वनडे आणि कसोटी... हरमनप्रीत कौरने अचानक सोडले सर्व फॉरमॅटचे कर्णधारपद, टीम इंडियाची धुरा आता कोणाकडे? 'या' खेळाडूचं नाव चर्चेत

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठ्या अपेक्षा! पगारवाढीपलीकडे OPS, कॅशलेस मेडिकलपासून रिस्क अलाऊन्सपर्यंत 'या' 9 प्रमुख मागण्या

गोव्यात सर्वात मोठा समाज, पण CM फक्त एकच; रवी नाईकांनंतर भंडारी समाजातील दिग्गज नेत्यांना संधी का मिळाली नाही? 2027 मध्ये दामू नाईकांचं काय?

Flydubai Flight Hijacking Plot: फ्लाईदुबई विमान हायजॅक मागे इराणचा हात? डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 9/11 सारखा हल्ला घडवण्याचा होता प्लॅन VIDEO

Shivaji Maharaj Statue: पुतळा हटवण्याऐवजी जागाच खरेदीचा प्रस्ताव; सरकारच्या धोरणावर गोवा खंडपीठ नाराज

SCROLL FOR NEXT