minor youth firing in delhi  ANI
देश

Viral Video: अल्पवयीन मुलाकडून भरदिवसा गोळीबार; वडिलांना झालेल्या मारहाणीचा बदला

गोळीबारात पीडित तरुण गंभीर जखमी; डोळ्यात गोळी लागल्याने रुग्णालयात उपचार सुरु

आदित्य जोशी

दिल्ली : राजधानी दिल्लीतील जहांगीरपुरी परिसरात एका अल्पवयीन मुलाने एक असं धक्कादायक कृत्य केलं आहे, जे ऐकून कुणाचाही थरकाप उडेल. आपल्या वडिलांना झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी अल्पवयीन मुलाने एकाला गोळी मारली. घटनेवेळी पीडित व्यक्ती एका पार्कमध्ये बसला होता. याचवेळी तीन अल्पवयीन मुलं त्याच्याजवळ आली आणि त्यातील एकाने पीडितावर गोळीबार करत तिघेही फरार झाले.

आरोपी मुलाने मारलेली गोळी पीडित व्यक्तीच्या डोळ्याला लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. पीडिताला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या या पीडिताची स्थिती स्थिर असून या घटनेचा एक व्हिडीओ (Video) समोर आला आहे, जो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी संध्याकाळी जहांगीरपुरी (Jahangirpuri )पोलीस स्टेशनमध्ये एक कॉल आला ज्यात एका व्यक्तीला गोळी मारल्याचं सांगण्यात आलं.पीडित व्यक्तीचं नाव जावेद असून तो जहांगीरपुरीतीलच एच-4 ब्लॉकमध्ये राहात असल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी जखमीला बीजेआरएम रुग्णालयात दाखल केलं. मात्र अधिकच्या उपचारांसाठी त्याला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

जहांगीरपुरीत एच ब्लॉकमध्ये राहणाऱ्या अंसार अहमद यांचा 36 वर्षीय मुलगा जावेद याच्या डाव्या डोळ्यात गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. संध्याकाळी 4.45 वाजण्याच्या सुमारास पीडित एका पार्कमध्ये बसला होता त्यावेळी अचानक त्याठिकाणी दाखल होत एका अल्पवयीन मुलाने गोळीबार केला ज्यात पीडित जखमी झाला. गोळ्या झाडल्यानंतर सर्व आरोपी पसार झाले आहेत.

पोलिसांनी याप्रकरणी कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून चारही आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी या घटनेत वापरण्यात आलेली बंदुक जप्त केली आहे. सात महिन्यांपूर्वी आपल्या वडिलांना झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी हा हल्ला केल्याची कबुली अल्पवयीन आरोपीने दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: फूड कॉम्बिनेशनचा डोक्याला शॉट लावणारा अजब प्रकार व्हायरल, नेटकरीही चक्रावले; व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल, 'हे ट्राय करु नका...'

IND vs AUS 1st T20: ऑस्ट्रेलियात 'सूर्य' तळपणार, कांगारुंना करणार सळो की पळो, हिटमॅन-किंग कोहलीचा 'तो' रेकॉर्ड निशाण्यावर?

भारताच्या ईशान्येकडील राज्यांवर 'नापाक डोळा'! बांगलादेशात दाखवले आसाम-अरुणाचल; मोहम्मद युनुस यांच्या नकाशा भेटीवरुन नवा वाद

SIR In Goa: विधानसभा निवडणुकीपूर्वी तयारी! दुसऱ्या टप्प्यात गोव्यात होणार 'एसआयआर'; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Women's World Cup 2025: भारतीय महिला संघाला मोठा धक्का! सलामीवीर प्रतीका रावल विश्वचषकातून बाहेर

SCROLL FOR NEXT