Michael Vaughan Viral Post Dainik Gomantak
देश

Viral Post: 'तुम हारने लायक ही हो...' आफ्रिकेविरूध्द टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव, दिग्गज खेळाडूची पोस्ट व्हायरल

Michael Vaughan Viral Post: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना कोलकाता येथे खेळवण्यात आला.

Sameer Amunekar

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना कोलकाता येथे खेळवण्यात आला. ईडन गार्डन्सवरील वळण घेणारी खेळपट्टी फलंदाजांसाठी अयोग्य ठरली आणि टीम इंडियाने हा सामना ३० धावांनी गमावला. भारताच्या पराभवानंतर, इंग्लंडचा दिग्गज खेळाडू मायकेल वॉनने खेळपट्टीवर प्रतिक्रिया व्यक्त केलेली पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

भारतीय क्रिकेट संघाला ईडन गार्डन्सच्या टर्निंग पिचवर दारुण पराभव पत्करावा लागला. तेव्हापासून, ही पिच सतत वादात सापडली आहे. गौतम गंभीरने पत्रकार परिषदेत दावा केला की ही पिच त्याला हवी होती तशीच होती, परंतु अनेक क्रिकेट दिग्गज ईडन गार्डन्सच्या पिचवर टीका करत आहेत.

दरम्यान, माजी इंग्लिश क्रिकेटपटू मायकेल वॉन यांनीही खेळपट्टीवर भाष्य केले. ते म्हणाले, "अशी खेळपट्टी तयार करा आणि तुम्ही जागतिक कसोटी विजेत्या संघाविरुद्ध हरण्यास पात्र आहात... दक्षिण आफ्रिकेसाठी हा एक उत्तम विजय आहे."

गौतम गंभीरने खेळपट्टीबद्दल काय म्हणाला?

सहा वर्षांनंतर, कोलकाता येथे एक कसोटी सामना खेळला गेला आणि पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली. तथापि, वळण घेणाऱ्या खेळपट्टीने सामन्याची मजा खराब केली, कारण दोन्ही संघ डावात २०० धावांचा टप्पाही गाठू शकले नाहीत. भारताचा अखेर ३० धावांनी पराभव झाला.

भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर म्हणाले, "खेळात विकेट्सची कमतरता नव्हती. अक्षर पटेल आणि टेम्बा बावुमा यांनी धावा केल्या. जर तुम्ही ४० विकेट्स घेतल्या तर वेगवान गोलंदाजांनाही अनेक विकेट्स मिळतील. ही अशी खेळपट्टी होती जी मानसिक कणखरता, तंत्र आणि संयमाला आव्हान देत होती. हीच ती खेळपट्टी होती ज्याची आम्ही शोधत होतो. क्युरेटरने आम्हाला खूप मदत केली. जर तुमचा बचाव मजबूत असेल तर यश मिळू शकते."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs SA: ''टीममध्ये काहीतरी गडबड...''! भारतीय संघाच्या लाजिरवाण्या पराभवावर चेतेश्वर पुजारा संतापला, फलंदाजांना फटकारले VIDEO

Sheikh Hasina: वडिलांनी बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला त्यांच्याच मुलीला त्याच देशात फाशीची शिक्षा का ठोठावली जातेय? जाणून घ्या तीन कारणं

VIDEO: "सह्याद्रीत जन्म, सह्याद्रीतच राहणार...", 'ओंकार हत्ती'ला वनतारात हलवण्याच्या निर्णयाला सिंधुदुर्गवासियांचा तीव्र विरोध

Pooja Naik: "जर खरोखर निर्दोष असाल तर कुटुंबासह शपथ घ्या!", पालेकरांचे वीजमंत्र्यांना नार्को टेस्टचे आव्हान

Goa Crime: मडगावात खळबळ! खारेबांध परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण, अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांकडून गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT