Crime News Dainik Gomantak
देश

Crime News: 14 वर्षांचा चिमुकला झोपेत असताना आईनेच केला घात; दोरीने गळा आवळून घेतला जीव

Crime: मनीषा (३७) हिने तिचा मुलगा पुरंजय (१४) झोपला असताना त्याचा गळा आवळून खून केला. यानंतर काही वेळातच तिने पोलिसांना मुलाचा खून केल्याची माहिती दिली.

Ashutosh Masgaunde

Mentally Challenged Woman in Rajasthan Allegedly Strangled Minor Son to Death:

राजस्थानमधील उदयपूर येथे रविवारी एका मतिमंद महिलेने आपल्या अल्पवयीन मुलाचा गळा दाबून खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही घटना सकाळी अंबा माता पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

आरोपी मनीषा (३७) हिने तिचा मुलगा पुरंजय (१४) झोपला असताना त्याचा गळा आवळून खून केला. यानंतर काही वेळातच तिने पोलिसांना फोन करून आपल्या मुलाचा खून केल्याची माहिती दिली. अशी माहिती पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलेला ताब्यात घेतले. ही घटना घडली तेव्हा तिचा पती मॉर्निंग वॉकसाठी गेला होता, असे त्यांनी सांगितले.

कुटुंबीयांनी सांगितले की, मनीषा काही दिवसांपासून मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होती आणि तिच्यावर उपचार सुरू होते.

तिने आपल्या मुलाची हत्या का केली याचे समाधानकारक उत्तर ही महिला देऊ शकली नाही,” असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे.

यावेळी पोलिसांनी शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांनी बाल्कनीचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी ही महिला खोलीत आरामात बसलेली दिसली.

महिलेपासून थोड्या अंतरावर मुलाचा मृतदेह बेडवर पडला होता. त्याच्या मानेवर दोरीच्या खुणाही होत्या. बेडजवळ 2 राशींचे तुकडे पडलेले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Of Baroda Cyber Attack: बँक ऑफ बडोदावर सर्वात मोठा सायबर हल्ला? 1 टीबी संवेदनशील डेटा डार्क वेबवर लीक; ग्राहकांची धडधड वाढली

Dharmendra Pradhan Reaction: "मी 'स्ट्रीट फायटर', एसी रुममध्ये बसणारा नाही!", राजीनाम्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांची पहिली प्रतिक्रिया; जुन्या आठवणींना दिला उजाळा

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच! अंपायरनं रनआऊट दिलं, तरीही फलंदाजानं सुरु ठेवली फलंदाजी; 'तो' निर्णय ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट Watch Video

Bihar Bandh Violence: बिहार बंददरम्यान विद्यार्थ्यांवर थेट 'एके-47' ने गोळीबार! पोलिसांचा अमानुष चेहरा कॅमेऱ्यात कैद; एसआयटी जवान डिस्मिस

America New Visa Policy: ऑनलाईन फ्रॉड अन् सेक्सटॉर्शन करणाऱ्यांना झटका! अमेरिकन नागरिकांना लुटणाऱ्या चिनी गँगवर निशाण्यावर; ट्रम्प सरकारची नवी व्हिसा पॉलिसी जाहीर

SCROLL FOR NEXT