Menstrual leave Dainik Gomantak
देश

Menstrual leave: मुलींसाठी मोठा निर्णय..मासिक पाळीदरम्यान मिळणार सुट्टी

Kerala: सरकारच्या नियंत्रणाखाली येणाऱ्या विद्यापीठाला हे नियम लागू होणार असल्याचे केरळ शासनाने म्हटले आहे.

दैनिक गोमन्तक

Menstrual Leave Policy: केरळ सरकारने केरळमधल्या मुलींसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. मासिक पाळीच्या काळात मुलींना सुट्टी मिळणार आहे. सरकारच्या नियंत्रणाखाली येणाऱ्या विद्यापीठाला हे नियम लागू होणार असल्याचे केरळ शासनाने म्हटले आहे.

मुलींच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी केरळ सरकारने हा निर्णय घेतल्याचं म्हटले आहे. केरळ सरकारच्या या निर्णयाचे सगळीकडून कौतुक होत आहे.

मासिक पाळीच्या दिवसांमध्ये मुलीना प्रचंड वेदनांना तोंड द्यावे लागते त्या काळात त्यांना आराम मिळावा म्हणून हा निर्णय घेण्यात आला होता.

केरळ राज्याचे उच्च शिक्षण मंत्री आर बिंदू म्हणाले की, सरकारने विभागांतर्गत असलेल्या सर्व राज्य विद्यापीठांमध्ये याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

मासिक पाळीच्या काळात विद्यार्थिनींना प्रचंड शारिरीक आणि मानसिक त्रास होत असतो. याची दखल घेत सर्व विद्यापिठात मासिक पाळीच्या काळात विद्यार्थिनींना सुट्टी मिळावी यासाठी योग्य ती पावलं उचलली जातील, असं उच्चशिक्षण मंत्री आर.बिंदू यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहलं आहे.

गेल्या महिन्यात, केरळमधील महत्मा गांधी महाविद्यालयात पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमादरम्यान 60 दिवसांची प्रसूती रजा देण्याचा निर्णय घेतला.

अलीकडेच, मातृत्व लाभ कायदा, 1961 च्या कलम 14 चे पालन करण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टा( Supreme Court )तही दाखल करण्यात आली आहे.

दरम्यान,मुलींना मासिक पाळीदरम्यान सुट्टीची योजना करणारे केरळ पहिले राज्य आहे. त्यामुळे केरळ(Kerala) शासनाच्या या निर्णयावर सगळीकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: आकाशात इंजिननं घेतला पेट अन् 272 प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला! डेल्टा एअरलाईन्सच्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग

हल्लेखोरांनी कार अडवली अन् 'शेलीं'ना ओढत नेलं, बगदादमध्ये भरदिवसा अमेरिकन महिला पत्रकाराचं अपहरण; सुरक्षा यंत्रणांकडून हाय अलर्ट

Ketu Nakshatra Parivartan: मघा नक्षत्रात केतुचं गोचर! 'या' 4 राशींसाठी 5 डिसेंबरपर्यंतचा काळ आव्हानात्मक; अचानक उद्भवणाऱ्या समस्यांमुळे आर्थिक गणित कोलमडणार

VIDEO: "आम्ही तयार आहोत, हिम्मत असेल तर समोर या" इराणी लष्कराचा थरारक सराव अन् अमेरिकेला थेट धमकी; व्हिडिओ होतोय व्हायरल

Goa Birch Fire Case: हडफडे अग्निकांडातील मुख्य संशयितांना मोठा दिलासा! लुथरा बंधूंना म्हापसा सत्र न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT