Member of Parliament Derek o brien criticized Central Government Dainik Gomantak
देश

'कायदा बनवताय की पापडी चाट'; तृणमुल खासदार राज्यसभेत आक्रमक

'सरासरी सात मिनिटांपेक्षा कमी वेळेत, बिल पास केले जात आहे...' संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केलेल्या विधेयकांचा आलेखच खासदार डेरेक ओब्रायन (Derek o brien) यांनी सादर केला आहे.

दैनिक गोमन्तक

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात झालेल्या गोंधळादरम्यान विधेयक मंजूर करण्यावरुन संतप्त झालेल्या डेरेक ओब्रायन यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. 2019 मध्ये तिहेरी तलाक कायदा अशाच प्रकारे मंजूर करण्यात आला होता, तेव्हा तेव्हा देखील त्यांनी आपण पिझ्झा डिलीवर करतो आहोत का? असe खोचक प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. सरासरी, 7 मिनिटांपेक्षा कमी वेळात बिल पास केले जात आहे. यावर नाराजी व्यक्त करत तृणमुलचे राज्यसभा खासदार डेरेक ओब्रायन यांनी ‘पापडी चाट बनवत आहोत का ?’ असा प्रश्न राज्यसभेत उपस्थित केला आहे. (Member of Parliament Derek o brien criticized Central Government)

डेरेक ओब्रायन यांनी सरकारने संसदेच्या प्रतिष्ठेला ठेच पोहोचवल्याचा आरोप केला आहे. ब्रायन यांनी ट्वीट करत, "संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या 10 दिवसात मोदी-शहा खूप घाईघाईत दिसत आहेत. 12 विधेयके मंजूर झाली, म्हणजेच सरासरी सात मिनिटांपेक्षा कमी वेळेत, बिल पास केले जात आहे” असे सांगितले. तसेच संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केलेल्या विधेयकांचा आलेखच या ट्विटमध्ये दिला आहे. आकडेवारीनुसार, विधेयक सादर झाल्यानंतर सात मिनिटांच्या आत मंजूर केले जात आहे.

यामध्ये ‘कोकोनट डेवलपमेंट बोर्ड बिल’ सर्वात कमी वेळेत म्हणजे 1 मिनिटांत मंजूर करण्यात आले. तर एयरपोर्ट्स इकोनॉमिक रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया विधायक सर्वात जास्त म्हणजे फक्त 14 मिनिटांत मंजूर झाले. दरम्यान, सरकारकडून अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. संसदेचे पावसाळी अधिवेशन 19 जुलै रोजी सुरू झाले आणि पेगासस, शेतकरी आंदोलन या यांसारख्या मुद्यांमुळे गदारोळ झाल्यामुळे एकही दिवस कामकाज व्यवस्थित झाले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Crocodiles Viral Video: हा कसला वेडेपणा! चक्क मगरीला दुचाकीवर घेऊन प्रवास, व्हिडिओ पाहून म्हणाल, खतरनाक...

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Goa News Live Updates: पर्ये सुरी हल्ला प्रकरण; आरोपीला ५ दिवसांची पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT