Aap Corporators Dainiik Gomantak
देश

Delhi MCD: बुरखा घालून शांत बसलेल्या आप नगरसेविकेचा फोटो व्हायरल, का होतेय चर्चा

Delhi Municipal Corporation: दिल्ली महानगरपालिकेत महापौरपदाच्या निवडणुकीपूर्वी बराच गदारोळ झाला. नामनिर्देशित सदस्यांना शपथ देण्यापूर्वी सभागृहात घोषणाबाजी, गोंधळ आणि हाणामारीही झाली.

दैनिक गोमन्तक

Delhi Municipal Corporation: दिल्ली महानगरपालिकेत महापौरपदाच्या निवडणुकीपूर्वी बराच गदारोळ झाला. नामनिर्देशित सदस्यांना शपथ देण्यापूर्वी सभागृहात घोषणाबाजी, गोंधळ आणि हाणामारीही झाली. सभागृहात पहिल्याच दिवशी गोंधळ, हाणामारी पाहायला मिळाली. मात्र, या गदारोळात आम आदमी पक्षाच्या (आप) महिला नगरसेविकेने सर्वांचे लक्ष वेधले, त्या सर्व काही शांतपणे पाहत होत्या. बुरखा घातलेली महिला नगरसेवक आपल्या जागेवर शांत बसून होती, तर बाकीचे सदस्य बाकावर उभे राहून घोषणाबाजी करत एकमेकांना धक्काबुक्की करत होते.

दरम्यान, शुक्रवारी दिल्लीतील (Delhi) पहिल्या एमसीडी बैठकीत लेफ्टनंट गव्हर्नर व्हीके सक्सेना यांनी 10 'एल्डरमन' (नामनिर्देशित नगरसेवक) नियुक्त केल्यावरुन आप आणि भाजप नगरसेवक एकमेकांशी भिडले. दिल्ली महानगरपालिकेच्या (एमसीडी) महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून भाजपचे (BJP) नगरसेवक सत्य शर्मा यांच्या शपथविधीनंतर बैठकीची सुरुवात झाली.

दुसरीकडे, शर्मा यांनी 'एल्डरमन' मनोज कुमार यांना शपथविधीसाठी आमंत्रित केल्यावर आप आमदार आणि नगरसेवकांनी विरोध केला. अनेक आमदार आणि नगरसेवक घोषणाबाजी करत पीठासीन अधिकाऱ्याच्या आसनाजवळ पोहोचले. यानंतर भाजप नगरसेवकांनी आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरु केली. प्रत्युत्तरादाखल आप सदस्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात घोषणाबाजी केली. दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांनी एकमेकांना धक्काबुक्की आणि मारहाण केली. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांवर मारहाणीचे आरोप केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: भाजपने गोव्याला केले ‘नशायुक्त’ राज्य; भाजप सरकारवर काँग्रेसचा घणाघाती आरोप

Horoscope: गुरुवार ठरणार खास! 'या' राशींना नोकरी-व्यवसायात मोठं यश, धनलाभ आणि प्रगतीचे प्रबळ संकेत

Goa Fast Track Immigration: गोव्यात सुरू होणार 'फास्ट ट्रॅक इमिग्रेशन'; गृहमंत्री अमित शहा आणि पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय

Arpora Nightclub Fire: कोर्टाचा आदेश धुडकावणे सचिवांना पडले महाग! बर्च अग्निकांड प्रकरणी 4 ग्रामपंचायतींने उत्तर दाखल न केल्याने हजेरीचे निर्देश

Meta Apology: मोदी सरकार आक्रमक होताच मार्क झुकेरबर्ग नमले! पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ हटवल्याप्रकरणी अन् बाललैंगिक मजकुरावर 'मेटा'कडून माफी

SCROLL FOR NEXT