AAP Activists Dainik Gomantak
देश

MCD Election: 'ही ही हंस दिहली रिंकिया के पापा', मनोज तिवारींच्या गाण्यावर AAP चा विजयी जल्लोष; Video

MCD Election Result: आम आदमी पक्षाने (AAP) दिल्ली महानगरपालिका (MCD) निवडणुकीत भाजप नेते आणि गायक मनोज तिवारी यांच्या गाण्याने विजय साजरा केला.

दैनिक गोमन्तक

MCD Election Result: आम आदमी पक्षाने (AAP) दिल्ली महानगरपालिका (MCD) निवडणुकीत भाजप नेते आणि गायक मनोज तिवारी यांच्या गाण्याने विजय साजरा केला. मनोज तिवारी यांच्या 'ही ही हंस दिहली रिंकिया के पापा' या प्रसिद्ध भोजपुरी गाण्यावर आप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. AAP उत्तर प्रदेशच्या ट्विटर हँडलवरुन कार्यकर्त्यांचा जल्लोष साजरा करतानाचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

दरम्यान, एमसीडी निवडणुकीत चमकदार कामगिरी करुन आप ने 134 जागा जिंकल्या आहेत. आप ने या प्रतिष्ठित नागरी संस्थेवरील भाजपची 15 वर्षांची सत्ता संपुष्टात आणली. एमसीडीच्या 250 प्रभागांमध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपला 104 तर काँग्रेसला केवळ नऊ जागा मिळाल्या. दुसरीकडे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नागरी सुविधा सुधारण्याचे वचन दिले आहे. विशेष म्हणजे, यासाठी त्यांनी केंद्र आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे "आशीर्वाद" मागितले आहेत.

तसेच, आप कार्यालयात पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, 'नागरी संस्था "भ्रष्टाचार आणि लाचखोरी"पासून मुक्त होईल. कडेकोट बंदोबस्तात राजधानीतील 42 मतमोजणी केंद्रांवर सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आणि सुरुवातीचा कल भाजपच्या बाजूने दिसत होता. एकवेळ अशी होती की, भाजप 107 जागांवर तर आप 95 जागांवर आघाडीवर होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT