Seema Haider Dainik Gomantak
देश

Seema Haider: सीमा हैदर आयएसआयच्या योजनेचा भाग? मौलाना म्हणाले, पाकिस्तानी महिलेला...

Manish Jadhav

Seema Haider: पाकिस्तानातून आपल्या चार मुलांसह भारतात आलेल्या सीमा हैदरची कहाणी दोन्ही देशांच्या मीडियामध्ये चर्चेत आली आहे. सचिनसोबत लग्न करण्यासाठी सीमाने इस्लाम सोडून हिंदू धर्म स्वीकारला आहे.

आता त्याच सीमा हैदरबाबत अखिल भारतीय जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन बरेलवी यांनी तिला पाकिस्तानात पाठवावे, असे म्हटले आहे. बरेलवी यांच्या म्हणण्यानुसार, सीमाला भारतात पाठवणे ही तेथील गुप्तचर यंत्रणांचा मोठा कट असू शकतो.

मौलाना मुफ्ती शहाबुद्दीन रिझवी बरेलवी यांनी म्हटले आहे की, पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय अत्यंत धोकादायक योजना बनवत असते. भारत अनेकदा त्याचे लक्ष्य असतो. आयएसआय नेहमीच भारताला अस्थिर करण्याचा कट रचत असतो. भारत-पाकिस्तान सीमेवर घुसखोरी करणे आणि जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी (Terrorist) कारवाया करणे हे आयएसआयचे काम आहे.

“आयएसआयचा कट यशस्वी होऊ नये”

मौलाना मुफ्ती शहाबुद्दीन रिझवी बरेलवी यांनी पुढे म्हटले आहे की, चार मुलांच्या आईने आपला देश आणि कुटुंब सोडून भारतात असेच राहायला यावे आणि धर्म बदलून कमी वयाच्या व्यक्तीशी लग्न करावे, ही बाब इतकी सोपी वाटत नाही. धर्मांतरानंतर महिलेला भारतात पाठवणे हा आयएसआयच्या धोकादायक रणनीतीचा भाग असल्याचे दिसते.

बरेलवी पुढे असेही म्हणाले की, भारत सरकारने तात्काळ सीमाला पाकिस्तानला (Pakistan) पाठवावे. तिला भारतात असेच राहू दिले, तर पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय आपल्या नियोजनात यशस्वी होण्याची शक्यता आहे. भारत सरकार आणि देशाच्या सुरक्षा यंत्रणांनी सीमा हैदरबाबत सतर्क राहायला हवे. सीमाचे असे भारतात येणे थक्क करणारे आहे.

"सचिनला मोहरा बनवता येईल"

मौलाना मुफ्ती शहाबुद्दीन रिझवी बरेलवी यांचेही म्हणणे आहे की, ग्रेटर नोएडा येथील रहिवासी सचिन मीना याचीही या संपूर्ण प्रकरणात दिशाभूल केली जाऊ शकते. सीमाच्या माध्यमातून आयएसआय त्याला आपला मोहरा बनवू शकते. यासोबतच सीमाची चारही मुलं हिंदू रितीरिवाजांनुसार राहतील, पण त्यांना शरियतनुसार हैदरची मुलं म्हटलं जाईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.

मुस्लिमांनी शरियतच्या विरोधात जाऊ नये

यासोबतच ऑल इंडिया जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन यांनीही मुस्लिमांनी शरियतच्या विरोधात जाऊ नये, असे म्हटले आहे. भारतातील (India) मुस्लिम देशभक्त आहे. देशाची सुरक्षा आणि बंधुभावाबाबात ते नेहमी बोलतात. सीमाचे भारतात असणे देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरु शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT