Masks  Dainik Gomantak
देश

दिल्लीत पुन्हा मास्क सक्ती, नियमांचे उल्लंघन केल्यास ₹ 500 दंड

आता दिल्लीत सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

Delhi Mask Mandatory : दिल्ली सरकारने या संदर्भात आदेश जारी केला आहे. मात्र, खासगी कारमधून प्रवास करणाऱ्यांना यातून सूट देण्यात आली आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत पुन्हा मास्क (Mask) घालणे अनिवार्य करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास 500 रुपये दंड आकारण्यात येणार आहे.

दरम्यान, गुरुवारी दिल्लीत (Delhi) 975 कोरोना रुग्णांची नोंद झाली, जी देशातील एकूण कोरोना रुग्णांच्या 45 टक्के आहे. दिल्लीत कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येबाबत बुधवारी दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठकही झाली, ज्यामध्ये अनेक खबरदारीच्या उपायांची शिफारस करण्यात आली होती. मास्क अनिवार्य करण्याचा मुद्दाही या बैठकीत उपस्थित करण्यात आला. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Chief Minister Yogi Adityanath) यांनी लखनऊ आणि एनसीआर जिल्ह्यांमध्ये मास्क वापरणे अनिवार्य करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

तसेच, कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे, अशा परिस्थितीत एनसीआर जिल्हे आणि लखनऊमध्ये सार्वजनिक ठिकाणी सर्वांसाठी मास्क अनिवार्य करण्यात आला आहे. कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्याबाबत लोकांना जागरुक करावे, असे निर्देशही योगींनी दिले आहेत.

दुसरीकडे, बुधवारी दिल्लीत कोरोनाचे 1009 नवीन रुग्ण आढळून आले, जे आदल्या दिवसाच्या तुलनेत 60 टक्क्यांनी जास्त होते. तर एका व्यक्तीचा संसर्गामुळे मृत्यू झाला. दिल्ली सरकारने पुन्हा एकदा सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे अनिवार्य केले असून त्याचे उल्लंघन केल्यास 500 रुपयांचा दंड ठोठावला आहे. हा आकडा 10 फेब्रुवारीपासून दिल्लीत नोंदवलेल्या सर्वाधिक रुग्णसंख्येचा आहे. 10 फेब्रुवारी रोजी दिल्लीत कोरोनाचे चे 1,104 रुग्ण आढळले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT