PUBG News, Married woman fall in love with pubg player News, PUBG Player News Dainik Gomantak
देश

'अजब प्रेम की गजब कहानी' PUBG खेळता खेळता पडली प्रेमात...; विवाहितेचं धक्कादायक पाऊल

पब्जीमुळे एक विवाहित महिला आणि तरुण एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत. पब्जीसह पब्जी प्लेअरच्या प्रेमात बुडालेल्या विवाहितेने धक्कादायक पाऊल उचललं आहे.

दैनिक गोमन्तक

पब्जी गेमवर (PUBG) किती तरी लोकांचं प्रेम आहे त्यामध्ये जास्त करुन युवा पिढी. याचं काही काही लोकांना इतकं वेड लागलं आहे की ते खाणंपिणंही विसरले आहेत, त्यांची तहान-भूक देखील हरपली आहे. पण याच पब्जीमुळे प्रेम जुळल्याचीही काही प्रकरणं समोर येत आहेत. आता अशाच एका पब्जी लव्हर कपलचं प्रेम प्रकरण सध्या चर्चेत आलं आहे. जे जरा शॉकिंग आहे. कारण पब्जीमुळे एक विवाहित महिला आणि तरुण एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत. पब्जीसह पब्जी प्लेअरच्या प्रेमात बुडालेल्या विवाहितेने धक्कादायक पाऊल उचललं आहे. (Married woman fall in love with pubg player).

हे प्रकरण उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) आहे. महाराजगंजमध्ये राहणारी ही महिला, जिला पब्जी खेळण्याची जाम हौस होती. कित्येक तास ती मोबाईलवरती पब्जी खेळत बसायची. याचवेळी बिहारमधील (Bihar) एका पब्जी प्लेअर तरुणाच्या प्रेमात ती पडली आहे. त्यानंतर अचानक एक दिवस ती गायब झाली आहे. पत्नी मिळेना म्हणून तिच्या पतीने पोलिसात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली आहे. श्यामदेउरवा पोलीस ठाण्यात ही तक्रार नोंदवण्यात आली आहे.

पतीने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी महिलेचा तपास सुरू केला आहे. ही महिला सापडली ती थेट बिहारमध्येच. तिच्या गायब होण्याचं कारण जेव्हा समजलं तेव्हा पतीला धक्काच बसला.

सतत मोबाईलवर पब्जी खेळणारी ही महिला पब्जी प्लेअरच्या प्रेमात पडली आहे. एक दिवस ती त्याला भेटायला गेली. ज्या पब्जी प्लेअरच्या प्रेमात ती पडली होती तो यूपीपासून तब्बल 350 किमी दूर बिहारमध्ये राहत होता. इतक्या लांब ती एक दिवस ती आपल्या या पब्जी प्लेअर बॉयफ्रेंडला भेटायलाही गेली. नवऱ्याला काहीच न सांगता ती घरातून बाहेर पडली होती.

पतीने आपली पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार 4 मार्चला नोंदवली होती. त्याचवेळी ती बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये राहणाऱ्या एका पब्जी प्लेअरशी देखील बोलायची. दोघं बोलता बोलात प्रेमात पडले आणि महिला घरातून फरार होत त्या तरुणाला भेटायलाही गेली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT