temple collapsed in Patel Nagar area in Indore Dainik Gomantak
देश

MP Indore Big accident on Ram Navami: रामनवमीला मोठी दुर्घटना, मंदिराच्या विहिरीचे छत कोसळले, भयानक घटनेचा Video

प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

इंदूरमध्ये रामनवमीच्या दिवशी मोठी दुर्घटना घडली. मंदिरातील विहीर पटेल नगर येथील झुलेलेलाल मंदिराच्या पायरीवरील छत कोसळल्याने अनेकजण आतमध्ये पडले आहेत. प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.

रामनवमीनिमित्त बेलेश्वर मंदिरात मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. यादरम्यान प्राचीन पायरी विहिरीचे छत कोसळल्याने किमान 25 जण पडल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, धार्मिक कार्यक्रमादरम्यान मंदिरातील प्राचीन पायरीच्या छतावर भाविकांची मोठी गर्दी जमली होती आणि छत जास्त लोकांचा भार सहन करू शकला नाही. .

आत्तापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. बाहेर काढण्यात आलेल्या 7 जणांना किरकोळ दुखापत झाली आहे.

अग्निशमन दलाचे काही जवान खाली उतरले असुन दोरीच्या साहाय्याने आत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले. या प्रकरणाची दखल घेत मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी भाविकांना सुखरूप बाहेर काढण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PAK Fan Controversy Statement: पाकिस्तानचा 'सनकी' चाहता! हारिस रौफला भेटला अन् म्हणाला, "बदला लेना, इंडिया को छोड़ना नहीं..." Watch Video

Goa Children Court: पोटच्या 20 वर्षीय मुलीचा खून करणाऱ्या बापाला जन्मठेप, आठ वर्षानंतर लागला निकाल

आम्ही देशप्रेमी, तू देशद्रोही! गोव्यात आणखी एका सामाजिक कार्यकर्त्याला धमकी, BJP नेत्याने धमकीचा फोन केल्याचा आरोप

Goa Live Updates: साखळीत वृद्ध भाजीविक्रेत्या महिलेला लुबाडले

E-Waste: प्रत्येक नव्या खरेदीमागे जुन्या उपकरणांचा कचरा वाढतो, तोच ढीग गंभीर समस्या म्हणून उभा राहतो; ई-कचऱ्याचा विळखा

SCROLL FOR NEXT