Manipur Violence Dainik Gomantak
देश

Manipur Violence: माणुसकीला काळीमा! महिलांची विवस्त्र धिंड नंतर बलात्कार; घटनेच्या दोन महिन्यांनी प्रकार आला समोर

Manipur Women: मणिपूर सध्या वांशिक हिंसाचाराच्या विळख्यात आहे, परंतु आता दोन महिलांची विवस्त्र धिंड काढत असलेल्या एका व्हिडिओवरून मणिपूरच्या डोंगराळ भागात तणाव पसरला आहे.

Ashutosh Masgaunde

Manipur Violence Viral Video: बुधवारी इंटरनेटवर दोन महिलांची विवस्त्र धिंड काढल्याचा दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर मणिपूरच्या डोंगराळ भागात तणाव वाढला आहे.

ही कथित घटना 4 मे रोजी कांगपोकपी जिल्ह्यात घडली, ज्याच्या एका दिवसानंतर उत्तर-पूर्व राज्यात हिंसाचार झाला.

या प्रकरणी दाखल केलेल्या तक्रारीत दोन महिलांना जमावासमोर विवस्त्र करण्यात आले होते. आदल्या दिवशी उसळलेल्या हिंसाचारानंतर जमावाने अपहरण केलेल्या पाच जणांपैकी त्या होत्या.

जमावाने एका 19 वर्षाच्या तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. यावेळी तरुणीच्या भावाने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याचा मृत्यू झाला.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कॉंग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टिका केली आहे.

या दुर्दैवी घटनेबाबत दाखल केलेल्या एफआयआर ची प्रत.
मणिपूरमधून येणार्‍या महिलांवरील लैंगिक अत्याचाराची चित्रे हृदय पिळवटून टाकणारी आहेत. महिलांवरील अत्याचाराच्या या भीषण घटनेचा जितका निषेध करावा तितका कमी आहे. समाजातील हिंसाचाराचा सर्वाधिक फटका महिला व बालकांना सहन करावा लागतो. मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी आपण सर्वांनी एका आवाजात हिंसाचाराचा निषेध केला पाहिजे. मणिपूरमधील हिंसक घटनांकडे केंद्र सरकार, पंतप्रधान डोळे झाकून का बसले आहेत? अशी चित्रे आणि हिंसक घटना त्यांना अस्वस्थ करत नाहीत का?
प्रियांका गांधी, कॉंग्रेस नेत्या
मणिपूरमध्ये गेल्या 4 मे पासून दोन समुदायात हिंसाचार सुरू आहे.

महिलांना विवस्त्र होण्यास भाग पाडले

पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत कांगपोकपी जिल्ह्यातील घटनेची तारीख 4 मे असल्याचे नमूद केले आहे. मात्र, एफआयआर 21 जून रोजी थौबल जिल्ह्यात नोंदवण्यात आला.

यामध्ये अज्ञात लोकांविरुद्ध अपहरण, सामूहिक बलात्कार आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

एफआयआरमध्ये म्हटले आहे की, “तिन्ही महिलांना त्यांचे कपडे काढण्यास भाग पाडण्यात आले आणि त्यांना जमावासमोर नग्न करण्यात आले.

असे झाले अपहरण

तक्रारीनुसार, मणिपूरमध्ये हिंसाचार भडकल्याच्या एका दिवसानंतर, 4 मे रोजी, AK रायफल्स, SLR, INSAS, आणि 303 रायफल्स यांसारख्या अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज सुमारे 800-1,000 लोक मणिपूरमधील एका गावात घुसले.

त्यांनी दुकाने लुटली, मालमत्ता आणि घरांची तोडफोड केली. तक्रारीनुसार, ते मीतेई समुदायाचे सदस्य असल्याचा संशय आहे, ते मीतेई लीपून, कांगलीपाक कानबा लुप, आरामबाई टेंगगोल आणि वर्ल्ड मेइटी कौन्सिल सारख्या संघटनांशी संबंधित आहेत.

त्यावेळी वेळी, पाच गावकरी दोन पुरुष आणि तीन महिला जवळच्या जंगलात पळून जाण्यात यशस्वी झाले. मात्र, पोलिस ठाण्यापासून दोन किमी अंतरावर जमावाने त्यांचे अपहरण केले.

तक्रारीनुसार, जमावाने प्रथम एका पुरुषाची हत्या केली आणि नंतर तीन महिलांना विवस्त्र होण्यास भाग पाडले.

एका 19 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा आरोप आहे आणि तिच्या भावाने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याची हत्या करण्यात आली. त्यानंतर महिला पळून गेल्या.

आतापर्यंत 160 हून अधिकांचा मृत्यू

मणिपूर राज्यात 3 मे पासून इम्फाळ खोऱ्यातील बहुसंख्य मीतेई आणि टेकड्यांवर कब्जा करणारे कुकी लोक यांच्यात जातीय संघर्ष सुरू आहे.

या हिंसाचारात आतापर्यंत 160 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

मीतेईचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याच्या कथित हालचाली विरोधात ऑल ट्रायबल स्टुडंट्स ऑर्गनायझेशन मणिपूरने 'आदिवासी एकता रॅली' काढल्यानंतर हिंसाचार वाढला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT