Fraud

 

Dainik Gomantak

देश

'कॉल बॉय' ची नोकरी मिळविण्यासाठी गेला अन्...

एका स्पेअर पार्टच्या दुकानात काम करणाऱ्या 25 वर्षीय तरुणाने कॉल बॉयची नोकरी मिळेल या आशेने कॉल बॉय वेबसाइटवर (Website) संपर्क साधला.

दैनिक गोमन्तक

एका स्पेअर पार्टच्या दुकानात काम करणाऱ्या 25 वर्षीय तरुणाने कॉल बॉयची नोकरी मिळेल या आशेने कॉल बॉय वेबसाइटवर संपर्क साधला. मात्र त्याची दोन महिला आणि एका पुरुषाने 1.54 लाख रुपयांची फसवणूक केली. तक्रारदाराला नंतर समजले की, ती एक फिशिंग वेबसाइट होती आणि त्याला सायबर-फसवणूक (Fraud) करणाऱ्यांनी फसवले.

22 डिसेंबर रोजी माटुंगा पोलिस (police) स्टेशनमध्ये एफआयआर नोंदवण्यात आला. तक्रारदाराने पोलिसांना सांगितले की, कॉल बॉय म्हणून नोकरी मिळविण्यासाठी मी 5 डिसेंबरला मोबाइल फोनवरुन वेबसाइटवर लॉग इन केले होते.

दरम्यान, वेबसाइटवरुन सिमरन शर्माचा (Simran Sharma) नंबर मिळवल्यानंतर तिला त्याने कॉल केला. तिने त्याला व्हॉट्सअ‍ॅपवर (whatsapp) बोलण्यास सांगितले. त्यानंतर दोघांनी बराच काळ चॅटिंगही सुरु केले. त्यानंतर सिमरनने त्याला फोटोसह संपूर्ण तपशील पाठवण्यास सांगितले.

तक्रारदाराने त्याचे सर्व तपशील पाठवल्यानंतर सिमरनने त्याला सदस्यत्व शुल्काचा फॉर्म पाठवला. त्यानंतर तिने त्याला अमित शर्मा नावाच्या एका ओळखपत्रासाठी सदस्यत्व शुल्क भरण्यास सांगितले आणि त्यामार्फत ग्राहक मिळवण्यासाठी त्याला त्याच्या कमाईची 20 टक्के रक्कम भरावी लागेल आणि उर्वरित 80 टक्के रक्कम तो ठेवू शकेल.

तक्रारदाराने सभासद होण्यासाठी आणि त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी फी भरली, सिमरन शर्माने त्याला एक ओळखपत्र पाठवले आणि उषा या महिलेचा नंबर आणि तिच्या मोबाईल क्रमांकासह तिच्यासोबत एक बैठक निश्चित झाली असल्याचे सांगितले.

त्यानंतर तिने तक्रारदाराला हॉटेलमध्ये रुम बुक करण्यासाठी, गर्भनिरोधक, कॅब सेवा, कॅब वेटिंग, सुरक्षा शुल्क आणि इतर विविध शुल्कांसाठी अतिरिक्त 32000 रुपये पाठवण्यास सांगितले. मात्र दरम्यान काहीतरी गडबड झाल्याचे सांगितले आणि उषाने त्याला आरोही नावाच्या दुसर्‍या महिलेशी जोडले. त्याच पद्धतीचा वापर करुन उषाने त्याला 1.22 लाख रुपये देण्यास सांगितले अन् त्यानंतर बैठकही रद्द केली. त्यानंतर त्याला समजले की, आपल्याला फसवण्यात आले आहे. त्यानंतर त्याने पोलिसांकडे जाण्याचा निर्णय घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"मोदी विरोधकांना घाबरवतात म्हणून मी तसे म्हणालो", मल्लिकार्जुन खर्गेंचं 'त्या' जहरी टीकेवर स्पष्टीकरण; भाजपकडून माफीची मागणी कायम VIDEO

VIDEO: 'गुजराती अडाणी' नंतर आता पंतप्रधान मोदी 'आतंकवादी'! मल्लिकार्जुन खर्गे यांची जीभ पुन्हा घसरली; तामिळनाडूचं राजकीय वातावरण तापलं

PM Kisan 23rd Installment: ठरलं! 'या' दिवशी खात्यात जमा होणार 2,000 रुपये, आजच उरका 'ही' 4 महत्त्वाची कामं अन्यथा पैसे अडकणार

Women Reservation Bill 2026: 30 वर्षांची प्रतीक्षा अन् शेवटी निराशाच! लोकसभेत 'महिला आरक्षणा'चं स्वप्न का भंगलं?

Operation Sindoor: घरात घुसून पाकड्यांना ठोकलं! एक वर्षांनंतरही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळात; 'ऑपरेशन सिंदूर'नं मोडलं कंबरडं

SCROLL FOR NEXT