Viral Video Dainik Gomantak
देश

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

Mustard Oil Tank Viral Video: व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक तरुण मोहरीच्या तेलाने भरलेल्या एका मोठ्या स्टोरेज टँकमध्ये उतरताना दिसत आहे.

Manish Jadhav

Mustard Oil Tank Viral Video: सोशल मीडियावर खाद्यपदार्थांच्या निर्मितीशी आणि स्वच्छतेशी संबंधित अनेक धक्कादायक व्हिडिओ वेळोवेळी समोर येत असतात. कधी मिठाई बनवताना कमालीचा अस्वच्छपणा दिसतो, तर कधी समोसे किंवा सोया चाप तयार करताना अत्यंत किळसवाण्या पद्धतींचा अवलंब केल्याचे आढळते. असे व्हिडिओ पाहून सामान्य नागरिकांचा खाद्यान्नाच्या शुद्धतेवरील विश्वास पुरता उडून जातो. मात्र, सध्या असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्याने लोकांना एका वेगळ्याच आणि गंभीर कारणाने चिंतेत पाडले. हा संपूर्ण प्रकार थेट आपल्या दैनंदिन स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या मोहरीच्या तेलाशी संबंधित आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक तरुण मोहरीच्या तेलाने भरलेल्या एका मोठ्या स्टोरेज टँकमध्ये उतरताना दिसत आहे. आश्चर्याची आणि संतापजनक बाब म्हणजे तो तरुण टँकमध्ये फक्त उभा न राहता, थेट त्या तेलात डुबकी मारतो. तो आपले केस त्या तेलाने धुताना दिसतो आणि संपूर्ण शरीराला तेच तेल चोळताना स्पष्टपणे पाहायला मिळतो. म्हणजेच, ज्या तेलाचा वापर पुढे हजारो घरांमध्ये स्वयंपाकासाठी आणि खाण्यासाठी केला जाणार आहे, त्याच तेलाच्या टँकमध्ये हा तरुण अंघोळ करताना दिसून येत आहे.

हा व्हिडिओ पाहून सोशल मीडिया युझर्सच्या मनात स्वच्छतेविषयी प्रचंड संताप निर्माण झाला. आपण घरांमध्ये जे तेल अत्यंत विश्वासाने वापरतो, ते तयार होताना किंवा साठवून ठेवताना अशा भयानक परिस्थितीतून जाते का, या विचारानेच लोक अस्वस्थ झाले. व्हिडिओमधील परिसर एखाद्या मोठ्या औद्योगिक भागासारखा दिसत असून तिथे लोखंडी सळ्या आणि इतर साहित्य पसरलेले दिसत आहे. तसेच जमिनीवरही तेल सांडलेले दिसून येते. टँकजवळ आणखी एक व्यक्ती उभी असलेली दिसते, तर हा तरुण आत उतरुन मोहरीच्या तेलात मजेत डुबक्या मारताना दिसतो.

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेक युझर्सनी तो सोशल मीडियावर (Social Media) शेअर करत खाद्यान्न सुरक्षेवर आणि प्रशासकीय व्यवस्थेवर थेट प्रश्न उपस्थित केले आहेत. एका युझरने नागरिकांना आवाहन केले की, बाजारातून मोहरीचे तेल खरेदी करण्यापूर्वी ते कुठे व कसे तयार होते, याच्या स्वच्छतेची तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे. लोकांच्या आरोग्याशी आणि विश्वासाशी थेट खेळणारा असा प्रकार एखादी व्यक्ती कशी काय करु शकते, असा सवाल करत नागरिकांनी यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Development: पर्वरीचा विकास वेगाने; परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम! फ्लायओव्हरपासून शेती, आरोग्य आणि क्रीडा सुविधांपर्यंत बदलांचा वेध

Parenting Rules For Children: मुलांना ‘नाही’ म्हणण्याची भीती बाळगू नका; आजची छोटी मर्यादा उद्याची मोठी दुर्घटना टाळू शकते!

Goa Congress: 'गोवा काँग्रेस' नावाला काँग्रेसचा आक्षेप; गिरीश चोडणकरांची गोवा खंडपीठात धाव, निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सवाल

Birch By Romeo Lane Fire: लुथरा बंधूंसह अजय गुप्ताचा जामीन रद्द; 2 आठवड्यांत आत्मसमर्पणाचे गोवा हायकोर्टाचे आदेश

Double Murder Case: रक्षाबंधनाच्या तोंडावर रुडकीत दुहेरी हत्याकांड! भावानेच दोन सख्ख्या बहिणींची गोळ्या झाडून केली हत्या; काळजाचा ठोका चुकवणारा थरार

SCROLL FOR NEXT