High Court
High Court Dainik Gomantak
देश

बलात्कार-हत्येप्रकरणी तीनदा फाशीची शिक्षा झालेल्याची 11 वर्षांनंतर सुटका; जाणून घ्या नेमंक प्रकरण!

Manish Jadhav

Madhya Pradesh Crime News: मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधून एक चकित करणारे प्रकरण समोर आले आहे. इथे 9 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याप्रकरणी एका व्यक्तीला तीनदा फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती, मात्र 11 वर्षांनंतर त्याची सुटका करण्यात आली आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे कसे शक्य आहे? वास्तविक, डीएनए रिपोर्टमधून समोर आलेल्या सत्यामुळे त्या व्यक्तीला सोडण्यात आले. मुलीच्या डीएनए रिपोर्टमधून खुलासा झाला होता की, वीर्य संबंधित आरोपीचे नसून दुसऱ्याच व्यक्तीचे असल्याचे समोर आले.

दरम्यान, 4 मार्च 2013 रोजी खंडवा येथील रहिवासी आणि शेतमजूर असलेल्या अनोखिलाल याला खंडवा येथील विशेष न्यायालयाने बाल लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण (POCSO) अंतर्गत फाशीची शिक्षा सुनावली होती. तेव्हा तो 21 वर्षांचा होता. पोलिसांनी एका महिन्याच्या आत तपास आणि खटला पूर्ण केला आणि 9 वर्षांच्या मुलीवर बलात्कार आणि खून केल्याप्रकरणी त्याला सर्वात कठोर शिक्षा ठोठावण्यात आली. आश्चर्यकारक बाब म्हणजे या मुलीच्या डीएनए रिपोर्टमधून खुलासा झाला की, वीर्य दुसऱ्याच व्यक्तीचे होते, परंतु असे असतानाही अनोखिलालला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.

दुसरीकडे, 4 मार्च 2013 च्या विशेष न्यायालयाच्या आदेशानुसार ज्या पुराव्याच्या आधारे त्या व्यक्तीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती, त्या पुराव्यात तो मुलीसोबत शेवटचा दिसला होता. डीएनए रिपोर्टमधून समोर आले की, अनोखिलालचा केस मुलीच्या हातावर दिसून आला. याशिवाय अनोखिलालच्या अंतर्वस्त्रावर मुलीच्या रक्ताचे डाग आढळून आले. परंतु 19 मार्च 2024 रोजी पुनर्विलोकन याचिकेवर सुनावणी करताना विशेष न्यायालयाच्या न्यायाधीश प्राची पटेल यांना डीएनए रिपोर्टमध्ये अनेक त्रुटी आढळल्या, ज्यामुळे अनोखिलालची निर्दोष मुक्तता करण्यात आली. सॅम्पल गोळा करणे, सील करणे आणि रिपोर्ट देणे यामध्ये अनेक गैरप्रकार झाल्याचे त्यांनी सांगितले. या अनियमिततेचे कारण देत अनोखिलाल याला सोडण्यात आले.

न्यायालयाने सांगितले की, मुलीच्या डीएनए रिपोर्टमधून हे स्पष्ट झाले की, वीर्य दुसऱ्याच व्यक्तीचे होते. अनोखिलालच्या शरीरातील टिश्यू मुलीच्या नखांमध्ये आणि त्याच्या अंतर्वस्त्रावर मुलीच्या रक्ताचे डाग आढळून आले होते. या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतरच आरोपीला शिक्षा होऊ शकते.

दुसरीकडे, महत्त्वाचा पुरावा म्हणून मुलीला आरोपीसोबत शेवटचे पाहिले गेलेला पोलिस तपासही न्यायालयाने फेटाळला. न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले की, आरोपीला पीडितेसोबत शेवटचे पाहिले गेले, परंतु त्याच्या पळून जाण्याचा प्रश्न असेल, तर तपासकर्त्यांनी स्वत: माहिती दिली होती की आरोपी पूर्वी तिथे काम करायचा आणि 8-10 दिवसांपूर्वी त्याने नोकरी सोडला होती अशा स्थितीत आरोपी फरार होता हे सिद्ध होत नाही. आरोपी केवळ पैसे घेण्यासाठी आला आणि पैसे घेऊन तो निघून गेला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अज्ञात युवकांकडून म्हावळींगे गावात 'भू-सर्व्हेक्षण'; संतप्त गावकऱ्यांनी सर्व्हेचे काम रोखले, संशयित ताब्यात

Goa Todays Live Update: राहुल गांधींविरोधात फोंड्यात पोलिस तक्रार!

Goa Filmcity: गोवा फिल्मसिटीच्या कामासाठी सरकारी हालचाली सुरु, वाद पुन्हा उफाळण्याची शक्यता

Goa Dam Water Level: गोव्यात चार दिवस यलो अलर्ट; कोणत्या धरणात किती पाणीसाठी?

Panjim Police: रझिया गँगच्या दोघांना गोव्यातील हॉटेलमधून अटक; चोरीचे 3.75 लाखांचे दागिने जप्त

SCROLL FOR NEXT