Viral Video Dainik Gomantak
देश

Viral Video: रामलल्लाची अनोखी भक्ती! रामभक्ताने पाठीवर काढला राम मंदिराचा टॅटू; व्हिडिओ पाहून लोक थक्क

Ram Temple Tattooed: अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाबाबत देश-विदेशातील लोकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला.

Manish Jadhav

Ram Temple Tattooed: अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाबाबत देश-विदेशातील लोकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. 22 जानेवारीला रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी हजारो रामभक्त अयोध्येत पोहोचले. यादिवशी प्रत्येकजण रामलल्लाच्या भक्तीत तल्लीन झालेला दिसत होता. परंतु जे लोक अयोध्येला पोहोचू शकले नाहीत त्यांनी रामलल्लाला आपल्यामध्ये इतकं वसवण्याचा प्रयत्न केला की लोकांना ते पाहून आश्चर्य वाटते. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका रामभक्ताने आपल्या पाठीवर भगवान राम आणि राम मंदिराचा टॅटू काढला आहे. या रामभक्ताची अशी भक्ती पाहून लोक थक्क झाले.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. या प्रयत्नाबद्दल अनेक जण त्या व्यक्तीचे कौतुक करताना दिसत होते, तर अनेकजण त्याच्या पाठीवर भगवान रामाचे रेखाटन बनवल्याबद्दल त्याच्यावर टीकाही करत होते. मात्र, त्या व्यक्तीने पाठीवर ज्या प्रकारची प्रतिमा कोरली आहे ते पाहून लोक थक्क झाले. 22 जानेवारीला शेअर केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत 10 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. @ranjeet_rajak_15 नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे.

दुसरीकडे, व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर लोकांच्या प्रतिक्रियांबद्दल बोलताना एका यूजरने व्हिडिओवर कमेंट करताना लिहिले की, तुम्ही रामजीचे भक्त आहात पण अशाप्रकारे भक्ती दाखवण्याची काही गरज नाही. त्याचवेळी, या रामभक्ताला सल्ला देताना एका यूजरने सांगितले की, जर तुम्हाला देवासाठी काही करायचे असेल तर त्याचे सदगुण तुमच्या आयुष्यात आणा, त्याचा फोटो नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT