Kanpur Man booked cruise and resort for marriage in Goa:  Dainik Gomantak
देश

गोव्यात तरूणाने लग्नासाठी बुक केले कुझ आणि रिसॉर्ट; पण पत्नीने लग्नाच्या पहिल्याच रात्री दिला दगा...

विश्वासघात केल्याचा पतीचा आरोप; पतीने पोलिसांना दिले सीसीटीव्ही फुटेज

Akshay Nirmale

Kanpur Man booked cruise and resort for marriage in Goa: लग्न ही आयुष्यातील एक महत्वाची गोष्ट असते. त्यामुळे लग्न अविस्मरणीय व्हावे, यासाठी लोक काय काय करत असतात. एका तरूण व्यापाऱ्यानेही अशाच पद्धतीने लग्नासाठी गोव्यात चक्क क्रुझ शिप बूक केली.

तसेच एक रिसॉर्टही बूक केले. पण, लग्नाच्या पहिल्याच रात्री त्याच्या पत्नीने त्याला फसवल्याचे समोर आले आहे.

कानपूरमधील तरूण व्यापाऱ्यासोबत ही घटना घडली आहे. आयुष खेमका असे या तरूण व्यापाऱ्याचे नाव आहे. खेमका यांनी म्हटले आहे की, मी खूप मनापासून लग्नाची तयारी केली. आणि थाटामाटात लग्न केले. पण माझ्या पत्नीने माझा विश्वासघात केला.

त्यामुळे मला आता आयुष्य उद्ध्वस्त झाल्यासारखे वाटत आहे. मी गोव्यात रिसॉर्ट बुक केले होते. विमानाने गोव्याला गेलो. तिथे जाऊन लग्न केले.

मात्र लग्नाच्या पहिल्या रात्रीच पत्नीने ती दुसऱ्याची असून तिच्या शरिरावर दुसऱ्या कुणाचा तरी अधिकार आहे, असे सुनावले. तसेच मला धक्काबुक्कीही केली.

खेमका म्हणाले की, पत्नीने मला आता न्यायालयीन प्रकरणांमध्ये अडकवले आहे. तिने तिचा प्रियकर असल्याचे सीसीटीव्ही फुटेज पुरावा म्हणून पोलिसांना दिले आहे. मला त्रास देण्यासाठी मी हुंड्यासाठी तिचा छळ केल्याची तक्रारही तिने दाखल केली आहे.

26 नोव्हेंबर 2021 रोजी कानपूरपासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या गोव्यात विमानाने आम्ही पोहचलो. तिथे लग्नाची मिरवणूक काढली. थाटामाटात लग्न केले. मुलीचे कुटुंबही कानपूरचे रहिवासी होते. हे एक हायप्रोफाईल लग्न होते.

लग्नाच्या मिरवणुकीत अनेक मान्यवर उपस्थित होते. लग्नाच्या रात्री रिसॉर्टमध्ये मात्र पत्नीने खेमका यांना दगा दिला.

खेमका म्हणाले की, लग्नाच्या पहिल्याच रात्री ती मला म्हणाली की, माझे दुसऱ्यावर प्रेम आहे, तू माझ्यापासून दूर राहा, मी तुझी पत्नी म्हणून राहणार नाही. माझ्या शरीरावर केवळ माझ्या मित्राचा अधिकार आहे.

पत्नीच्या तोंडचे हे उद्गार ऐकून खेमका यांना आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचे वाटले. त्यानंतर मुलगी सासरी आली. पण खेमका यांनी लाजेखातर ही गोष्ट कुणालाच सांगितली नाही. पण सासरीही पत्नीच्या वृत्तीत काहीही फरक पडला नाही.

त्यानंतर तरूणाने घरच्यांच्या कानावर ही बाब घातली. पण, पत्नीचे मामा जे शहरातील मोठे व्यापारी आहेत त्यांनी येऊन धमकी दिली. घरात घुसून मारहाणही केली. आईला मारहाण केली आणि घरातील दागिने चोरून नेले. त्यामुळे पोलिसांत तक्रार दिली.

दरम्यान, खेमका यांची पत्नी तिच्या कथित प्रियकराला सासरच्या घरातही मिठी मारताना दिसली होती. त्याचे सीसीटीव्ही फुटेजही खेमका यांनी पोलिसांना दिले आहे.

दरम्यान, पत्नीकडून आता खेमका यांच्यावर हुंड्याची तक्रार दाखल केली आहे. हिंदी प्रसारमाध्यमांनी याबाबतचे वृत्त दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT