Man arrested for making bomb attack threat at Narendra Modi Stadium:
अहमदाबाद गुन्हे शाखेने शहरातील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हल्ल्याची धमकी देणारा ईमेल पाठवल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक केली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी बुधवारी दिली.
कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या आरोपीला गुजरातमधील राजकोट येथून अटक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
हे भव्य स्टेडियम सध्या सुरू असलेल्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या ठिकाणांपैकी एक आहे आणि येथे 14 ऑक्टोबर रोजी भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना खेळवला जाणार आहे.
स्टेडियमवर स्फोट होईल असा दावा करणारा ईमेल आरोपीने कथितपणे पाठवला होता, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
हा आरोपी मूळचा मध्य प्रदेशचा असून, तो राजकोट शहराच्या बाहेरील भागात राहत होता.
"त्याने त्याच्या फोनवरून एक संक्षिप्त मेल पाठवला होता आणि त्याचे नाव लिहिले होते. त्याची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही," असे अधिकाऱ्याने सांगितले.
अहमदाबाद पोलिसांनी यापूर्वी सांगितले की, 14 ऑक्टोबर रोजी भारत-पाकिस्तान विश्वचषक क्रिकेट सामन्यासाठी अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. तेसेच आरोपीला पकडल्यामुळे याबाबत आता कोणतीही भीती राहिली नाही.
गुजरात पोलीस, NSG, RAF आणि होमगार्डसह विविध एजन्सीचे ११,००० हून अधिक कर्मचारी अहमदाबादमध्ये आणि नरेंद्र मोदी स्टेडियमवर १४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यादरम्यान तैनात केले जातील, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सोमवारी सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.