UP Assembly Election 2022 Dainik Gomantak
देश

UP Assembly Election 2022: ममता बॅनर्जींचा आज यूपी दौरा

समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या बोलवण्यावरुन ममता बॅनर्जी आज दोन दिवसांच्या लखनौ दौऱ्यावरती येत आहेत.

दैनिक गोमन्तक

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आता उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुक 2022 मध्ये (UP Assembly Election 2022) उतरणार आहेत. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्या बोलवण्यावरुन ममता बॅनर्जी आज दोन दिवसांच्या लखनौ दौऱ्यावरती येत आहेत. ममता बॅनर्जी उद्या अखिलेश यादव यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद (Joint Press Council) घेणार असून दोन्ही नेते व्हर्च्युअल रॅलीही काढणार आहेत. ममता दिदी यूपीमधील जनतेला भाजपचा (BJP) पराभव करून समाजवादी पक्षाला प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन करणार आहेत.

ममता बॅनर्जी आज संध्याकाळी 5 वाजता लखनौ विमानतळावर पोहोचणार आहेत. विमानतळावरून ममता बॅनर्जी हजरतगंज येथील लेवाना स्वीटमध्ये जातील जिथे त्या विश्रांती घेतील, यानंतर त्या समाजवादी पक्षाच्या कार्यालयात पोहोचतील. 8 फेब्रुवारी म्हणजेच मंगळवारी ममता बॅनर्जी समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासोबत वर्चुअल बैठकीत सहभागी होणार आहेत.

बंगाल विधानसभा निवडणुकीदरम्यान अखिलेश यादव यांनी ममता बॅनर्जी यांच्या पक्ष टीएमसीला (TMC) पाठिंबा दिला होता. प्रचारासाठी ते बंगालमध्ये गेले नसले तरी. आता ममता बॅनर्जी लखनौ दौऱ्यात तेच कर्ज परत करणार आहेत, याची घोषणा उद्या रॅली आणि संयुक्त पत्रकार परिषदेत होऊ शकते.

आतापर्यंत प्रादेशिक पक्षांसह राष्ट्रवादी काँग्रेस, राजद यांनी सपाला पाठिंबा दिला आहे. पण आता टीएमसीचाही पाठिंबा मिळण्याची आशा आहे. सीएम ममता बॅनर्जी यांनी आधीच स्पष्ट केले आहे की टीएमसी यूपीमध्ये निवडणूक लढवणार नाही.

यूपीमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे, यूपीमध्ये भाजप आणि समाजवादी पक्षामध्ये थेट मुख्य लढत होणार आहे. पीएम नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi), केंद्रीय मंत्री अमित शाह (Union Minister Amit Shah), राजनाथ सिंह ( Rajnath Singh), योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath), जेपी नड्डा (JP Nadda), स्मृती इराणी ( Smriti Irani) यांसारखे सर्व बडे नेते भाजपकडून प्रत्येक जिल्ह्यात प्रचार करत आहेत, तर अखिलेश यादव यांची आघाडी मात्र या बाबतीत कमकुवत वाटत होती.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे 2022 च्या पुढे जाऊन 2024 साठी ममता यांची ही योजना आहे, ज्यामध्ये त्या स्वत:च्या पंतप्रधानपदावर दावा करण्यासाठी प्रादेशिक पक्षांशी हातमिळवणी करत आहेत. ममता बॅनर्जी यांना बिगर भाजप आणि बिगर काँग्रेस पक्षांची आघाडी बनवायची आहे, यूपीतील अखिलेश यादव हे त्यातील, महत्त्वाचा दुवा असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT