mamata banerjee Dainik Gomantak
देश

पेट्रोल-डिझेल करावरुन ममता बॅनर्जींचा मोदींवर पलटवार

पंतप्रधान मोदी याचं विधान एकांगी असल्याचं व्यक्त केलं मत

दैनिक गोमन्तक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक घेत देशातील कोरोना स्थितीचा आढावा घेत अनेक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना इंधन दरवाढीवरुन ही सुनावलं होतं. याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिउत्तर देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला देणे बाकी असलेल्या थकबाकीची ही आठवण करुन दिली होती. याच मुद्यावरुन ममता बॅनर्जी यांनी ही मोदींवर टीकास्त्र सोडले आहे.(Mamata Banerjee criticizes Modi about petrol-diesel tax )

पण पंतप्रधान मोदींच्या या विधानाचा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी खरपूस समाचार घेतला आहे. “पंतप्रधान मोदी याचं विधान एकांगी असून लोकांना संभ्रमात टाकणारं आहे. त्यांनी बैठकीत सांगितलेले तथ्य खोटे आहेत. गेल्या तीन वर्षांपासून आम्ही पेट्रोल आणि डिझेलवर सबसिडी देत आहोत. यासाठी आम्ही एकूण १५०० कोटी रुपये खर्च केले आहेत”, अशा शब्दांत त्यांनी मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे.

ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या की, “पंतप्रधान मोदी राज्यातील पेट्रोल आणि डिझेलवरील कर कपात करण्याचं आवाहन करत आहेत. पण केंद्र सरकारकडे आमची ९७ हजार कोटींची थकबाकी आहे. केंद्राने यातील आर्धी रक्कम जरी दिली, तरी आम्ही कर कमी करू. नागरिकांच्या हिताचा विचार करून त्यांना त्वरित ३ हजार कोटींची सबसिडी देऊ. सबसिडी देण्यासाठी मला काहीही अडचण नाही. पण केंद्राकडे थकबाकी असल्याने राज्य सरकार कसं चालवायचं?” असा प्रश्नही त्यांनी यावेळी विचारला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

Son Appeal Rejected: वडिलांच्या मृत्युपत्राला आव्हान देणाऱ्या मुलाचे अपील फेटाळले; स्वतःच्या हिश्शाची जमीन मुलीला देण्याचा अधिकार कायम

KBC 18: पणजीतील 'पहिली चाहती' आजही संपर्कात; अमिताभ बच्चन यांच्या आठवणींनी रंगला 'केबीसी', अजित पुनियांनी जिंकले 12.5 लाख

SCROLL FOR NEXT