Mahua Moitra Dainik Gomantak
देश

'संविधान मला मांस खाण्याची परवानगी देतयं...'

देशातील राजकारण (Politics) मागील काही दिवसांपासून वेगाने बदलत आहे.

दैनिक गोमन्तक

देशातील राजकारण मागील काही दिवसांपासून वेगाने बदलत आहे. याच पाश्वभूमीवर तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनीही दक्षिण दिल्लीच्या महापौरांच्या नवरात्रीच्या काळात मांस दुकानांवर बंदी घालण्याच्या वक्तव्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांनी आज नवरात्रीच्या काळात दिल्लीतील (Delhi) विविध भागात मांस दुकानांवर बंदी घालण्यात आल्याने टीका केली आहे. मोईत्रा यांनी सोशल मिडीयावरील ट्वीटरुन ट्विट करत म्हटले की, ''मी दक्षिण दिल्लीत राहते. संविधानाने (Constitution) मला पाहिजे तेव्हा मांस खाण्याची परवानगी दिली त्याचप्रमाणे दुकानदाराला त्याचा व्यवसाय चालवण्याचे स्वातंत्र्य दिले आहे.'' (Mahua Moitra said As the constitution allows me to eat meat so does the shopkeeper allow me to sell meat)

दरम्यान, दक्षिण दिल्लीचे महापौर मुकेश सूर्यन (Mukesh Suryan) यांनी सांगितले होते की, ''नवरात्रीच्या काळात मांस विक्री करणाऱ्या दुकानांवर बंदी घातली जाईल. तक्रारींनंतर हे पाऊल उचलण्यात आले असून त्यामुळे कोणाच्याही वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा येत नाही, असा दावा त्यांनी केला.'' दक्षिण दिल्ली महानगरपालिकेचे महापौर सूर्यन पुढे म्हणाले, "आम्ही सर्व मांस विक्रीची दुकाने बंद करु. जेव्हा मांस विकले जात नाही, तेव्हा लोक ते खाणार नाहीत."

सूर्यन यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले की, लोकांनी माझ्याकडे तक्रार केल्यामुळे आम्ही दिल्लीकरांच्या भावना लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोणाच्याही वैयक्तिक स्वातंत्र्याचे उल्लंघन नाही.'' ते पुढे म्हणाले, ''8, 9, 10 एप्रिल रोजी आम्ही सर्व कत्तलखानेही बंद करु. पूर्व दिल्ली महानगरपालिकेचे महापौर श्याम सुंदर अग्रवाल यांनी देखील हीच मागणी केली आहे. ते पुढे म्हणाले की, "उत्सवादरम्यान मांस विक्रीची दुकाने बंद करण्यात आम्हाला आनंद होईल."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT