Mahua Moitra Dainik Gomantak
देश

Cash For Query Case: कॅश फॉर क्वेरी प्रकरणी महुआ मोइत्रा यांचे संसद सदस्यत्व रद्द

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांचे लोकसभेचे सदस्यत्व कॅश फॉर क्वेश्चन प्रकरणी रद्द करण्यात आले आहे.

Manish Jadhav

Mahua Moitra Loksabha Membership Suspended: तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांचे लोकसभेचे सदस्यत्व कॅश फॉर क्वेरी प्रकरणी रद्द करण्यात आले आहे. महुआ मोईत्रा यांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी एनडीएने आणलेला ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे. आज सभागृहाचे कामकाज सुरु होताच लोकसभेत एथिक्स कमिटीचा अहवाल सादर करण्यात आला.

दरम्यान, लोकसभेत मंजूर झालेला प्रस्ताव बहुमताने मान्य झाल्याने मोइत्रा यांना त्यापूर्वी बोलण्याची संधीही मिळाली नाही. आज दुपारी 12 वाजता महुआ मोईत्रा यांच्याबाबत एथिक्स कमिटीचा अहवाल सादर करण्यात आला, ज्यामध्ये महुआ मोईत्रा यांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी एनडीएने आणलेला ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. यानंतर सभागृहात प्रचंड गदारोळ झाला आणि त्यानंतर 2 वाजता कामकाज सुरु झाले. त्यानंतर सुमारे तासभर चर्चा सुरु राहिली आणि मतदानानंतर महुआ मोईत्रा यांची हकालपट्टी करण्यात आली. सभागृहाच्या निर्णयानंतर महुआ मोईत्रा यांची यासंबंधी प्रतिक्रियाही आली आहे. माझ्याविरुद्ध कोणताही पुरावा नसल्याचे त्यांनी सांगितले. मी अदानीचा मुद्दा उपस्थित केला होता आणि त्याची शिक्षा मला भोगावी लागली आहे.

महुआ मोइत्रा म्हणाल्या की, ''माझ्याविरुद्ध योग्य तपास झाला नाही. आरोप करणाऱ्यालाही चौकशीसाठी बोलावले नाही. समितीने या प्रकरणाची सखोल चौकशी केली असती तर असा निर्णय झाला नसता. महत्त्वाच्या मुद्द्यांवरुन लक्ष हटवण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे.'' महुआ पुढे म्हणाल्या की, 'अहवालात ज्या गोष्टींचा उल्लेख आहे, त्या प्रतिज्ञापत्रात नमूद केल्या नाहीत.' पैसे आणि भेटवस्तू घेऊन प्रश्न विचारल्याचा कोणताही पुरावा नसल्याचे महुआ यांनी सांगितले. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान ज्या व्यावसायिकाकडून पैसे आणि भेटवस्तू घेतल्याचा आरोप आहे, त्या व्यावसायिकाला एथिक्स समितीने का बोलावून प्रश्न विचारले नाहीत? असा सवाल देखील यावेळी महुआ यांनी विचारला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT