Minister Pradyumna Singh Dainik Gomantak
देश

Madhya Pradesh: मध्य प्रदेशचे ऊर्जा मंत्री म्हणाले, 'हवं असेल तर मला जोडे मारा...'

Minister Pradyumna Singh: ऊर्जामंत्री प्रद्युम्न सिंह तोमर यांनी घर पाडल्यामुळे संतप्त झालेल्या लोकांशी संवाद साधला.

दैनिक गोमन्तक

Minister Pradyumna Singh: नेहमीच चर्चेत राहणारे शिवराज सरकारमधील ऊर्जा मंत्री प्रद्युम्न सिंह तोमर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ऊर्जामंत्री प्रद्युम्न सिंह तोमर घर पाडल्यामुळे संतप्त झालेल्या लोकांशी संवाद साधत आहेत. तोमर म्हणाले की, 'तुम्हाला हवं असेल तर मला जोडे मारा. पण मी जे भावी पिढ्यांच्या हिताचे आहे तेच करेन. तुम्ही मला निरुपयोगी समजत असाल आणि मी तुमच्या कामाचा नाही असे मानत असाल तर मी आजच राजीनामा देईन.' प्रद्युम्न सिंह तोमर हे ज्योतिरादित्य सिंधिया यांचे समर्थक मानले जातात.

दरम्यान, ग्वाल्हेरच्या फोर्ट गेट चौकापासून फुलबाग सेवानगरपर्यंतच्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम ऊर्जामंत्री प्रद्युम्न सिंह तोमर यांच्या मतदारसंघात लटकले आहे. याचे रुंदीकरण करण्यासाठी सातत्याने अतिक्रमण हटाव कारवाई सुरु आहे. त्यामुळे लोकांचा या कारवाईला विरोध होत आहे. रविवारी जिल्हा प्रशासन आणि महापालिका कर्मचाऱ्यांनी (Employees) अतिक्रमणावर कारवाई केली. यादरम्यान प्रचंड गोंधळ झाला. त्यामुळे पोलिसांना (Police) लाठीचार्ज करावा लागला. त्यानंतर स्थानिक लोकांनी ऊर्जामंत्री प्रद्युम्न सिंह तोमर यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

दुसरीकडे, याची माहिती ऊर्जामंत्री प्रद्युमन सिंह तोमर यांना मिळताच ते संतप्त लोकांमध्ये पोहोचले. रस्त्याच्या मधोमध उभे राहून ते त्यांच्याच शैलीत बोलू लागले. संतप्त लोकांशी संवाद साधताना ते म्हणाले की, 'जर तुम्हाला मी निरुपयोगी आहे असे वाटत असेल तर मी लगेच राजीनामा देतो. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही मला जोडे मारु शकता. पण मी तेच काम करेन जे येणाऱ्या पिढ्यांचे हित आहे. येणाऱ्या पिढ्यांसाठी हे अत्यंत महत्त्वाचे काम आहे. अनेक वर्षांपासून हे काम रखडले आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अमेरिकेत 'इंडिया डे'चा धमाका! 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त न्यू यॉर्कची 'अँपायर स्टेट बिल्डींग' झाली तिरंगामयी; तारक मेहताच्या कलाकारांची खास उपस्थिती

Goa Crocodile Video: गोव्यात घरात घुसली भलीमोठी मगर; कुटुंबाची उडाली तारांबळ, वन विभागाकडून मगरीची सुरक्षित सुटका

PM Modi Mental Naxalism Statement: मोदींच्या ‘बौद्धिक नक्षली’ उल्लेखावरून रणकंदन; विरोधकांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

Upasnagar Sankval Junction: भुयारी मार्ग नाही तर रस्त्यावर उतरू! उपासनगर-सांकवाळ ग्रामस्थांचा इशारा; चौक ठरतोय ‘मृत्यूचा सापळा’

VIDEO: "चिदंबरम यांच्या काळात 5000 निष्पाप मारले गेले!"; 'दिमागी नक्षल' मुद्द्यावरुन भाजपचा काँग्रेसवर कडाडून हल्लाबोल, सुधांशु त्रिवेदींनी घेतलं फैलावर

SCROLL FOR NEXT