Union Home Minister Amit Shah Dainik Gomantak
देश

Madhya Pradesh Assembly Election 2023: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणूक रॅलीत काँग्रेसवर केले मोठे आरोप; म्हणाले...

Madhya Pradesh Assembly Election 2023: मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे दोन दिवस उरले आहेत.

Manish Jadhav

Madhya Pradesh Assembly Election 2023: मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे दोन दिवस उरले आहेत. अशा स्थितीत राज्यातील राजकीय तापमान वाढले आहे. राज्यात निवडणूक प्रचारसभा घेऊन भाजपकडून विरोधी पक्षांवर आरोप-प्रत्यारोपांचा फैरी झाडल्या जात आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिवपुरी जिल्ह्यातील करैरा विधानसभेत निवडणूक रॅलीला संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यावर जोरदार निशाणा साधला. शाह म्हणाले की, काँग्रेस पक्ष जेव्हा जेव्हा सत्तेत आला तेव्हा घर भरण्याचे काम केले.

एससी, एसटी आणि ओबीसींसाठी काँग्रेसचे बजेट 1000 कोटी रुपये होते. मात्र आम्ही 1000 कोटी रुपयेवरुन ते 64 हजार कोटी रुपये केले. वर्षभरात फक्त 4 हजार एमएसएमईची नोंद व्हायची, त्याऐवजी आज 3 लाख 62 हजार एमएसएमईची नोंदणी झाली आहेत.

काँग्रेसने राज्य अंधारात ठेवले - अमित शाह

अमित शाह (Amit Shah) म्हणाले की, मतदान करताना हे लक्षात ठेवा की तुम्ही डबल इंजिनचे सरकार चालू ठेवण्यासाठी मतदान करत आहात ज्याने मध्य प्रदेशला अतुलनीय राज्य बनवले आहे.

एका बाजूला मध्य प्रदेशला अनेक वर्षे अंधारात ठेवून बिमारु राज्य बनवणारे काँग्रेस सरकार आहे. दुसरीकडे, गेल्या 18 वर्षांत शेतकरी, दलित, मागासवर्गीय, आदिवासी, महिला आणि तरुणांच्या हितासाठी काम करणारे भाजपचे सरकार आहे.

कलम 370 आणि राम मंदिराचा उल्लेख

अमित शाह पुढे म्हणाले की, शिवराज सिंह चौहान यांनी माता-भगिणींसाठी लाडली लक्ष्मी योजना सुरु केली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा आणि विधानसभेत माता-भगिनींना 33 टक्के आरक्षण दिले.

गृहमंत्र्यांनी कलम 370 हटवल्याचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, राहुल गांधी म्हणायचे की कलम 370 हटवले तर भूकंप (Earthquake) होईल आणि रक्ताच्या नद्या वाहू लागतील. रक्ताच्या नद्या सोडा, दगड उचलण्याची कोणाची हिंमत नाही.

अमित शाह यांनी अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या राम मंदिराचाही उल्लेख केला. यालाही काँग्रेस झुगारत असल्याचे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourism: गोव्याची बदनामी करण्याचा छुपा अजेंडा, 'तो' व्हायरल डेटा चीनचा; पर्यटन वादावर पर्यटनमंत्री पहिल्यांदाच बोलले

Cash For Job Scam: नोकऱ्यांचा चोरबाजार! 'त्या' ऑडिओतील मोन्सेरात कोण? महसूलमंत्री संतापले, सखोल चौकशीची केली मागणी

उत्पल पर्रीकरांनी पहिल्यांदाच दिला मंत्री बाबूशना पाठिंबा, दिवसभर गाजले Cash For Job Scam प्रकरण; वाचा ठळक बातम्या

Jonty Rhodes: राहण्यासाठी गोवा का निवडला? पर्यटन वादात दक्षिण आफ्रिकेच्या माजी क्रिकेटरने दिलेल्या उत्तराने मने जिंकली

PWD Goa: फक्त एका एक्लिवर मिळणार पिण्याच्या पाण्याचे सर्व अपडेट्स; PDW ची गोवेकरांसाठी नवीन उपाययोजना

SCROLL FOR NEXT