PM Narendra Modi Dainik Gomantak
देश

Loksabha Election 2024 Result Update: पंतप्रधान मोदींची पिछाडीनंतर मोठी आघाडी; कॉंग्रेस उमेदवार अजय राय यांना मोठा धक्का

Manish Jadhav

Loksabha Election 2024 Result Update: लोकसभा निवडणुकीच्या महासंग्रामाचा आज निकाल आहे. यंदाची लोकसभा निवडणुक सात टप्प्यात पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप तिसऱ्यांदा सत्ता मिळवणार का याचा निकाल आज लागणार आहे. संपूर्ण निवडणुकीत भाजप आणि कॉंग्रेस यांच्या निकराची लढाई झाली. यंदाच्या निवडणुकीत पंतप्रधान मोदी वारावणसी या हॉट सीटवरुन तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यासमोर काँग्रेसचे अजय राय आणि बहुजन समाज पक्षाचे अथर जमाल आहेत. गेल्या दोन निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सीटवरुनच मोठा विजय नोंदवला होता. 2014 च्या तुलनेत, 2019 मध्ये त्यांच्या विजयाचे अंतर एक लाखाने अधिक वाढले होते. उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींशी सामना करत आहेत.

दरम्यान, वाराणसी मतदारसंघातून पहिल्या फेरीत पंतप्रधान मोदी पिछाडीवर होते. अजय राय यांनी आघाडी घेतली होती. परंतु दुसऱ्या फेरीत पंतप्रधान मोदींनी मोठी आघाडी घेतली. मोदी सध्या तब्बल 33206 मतांनी आघाडीवर आहेत. तर त्यांचे विरोधक अजय राय 81604 ( -33206) पिछाडीवर आहेत. पंतप्रधान मोदी वाराणसीमधून पुन्हा एकदा भरघोस मतांनी विजयी होतील, असा विश्वास भाजपकडून व्यक्त करण्यात आला आहे.

गेल्या निवडणुकीत काय निकाल लागले?

2019 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 6,74,664 मते मिळाली होती. तर प्रतिस्पर्धी समाजवादी पक्षाच्या शालिनी यादव यांचा सुमारे 4.80 लाख मतांच्या मोठ्या फरकाने मोदींनी पराभव केला होता. त्या निवडणुकीत शालिनी यादव यांना 1,95,159 मते मिळाली होती तर काँग्रेसचे अजय राय 1,52,548 मते मिळवून तिसऱ्या नंबरवर राहिले होते.

दुसरीकडे, 2014 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वाराणसीत शड्डू ठोकला होता. मात्र, केजरीवाल यांना पंतप्रधान मोदींकडून दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्या निवडणुकीमध्ये पंतप्रधान मोदींना 5,81,022 मते मिळाली होती. तर प्रतिस्पर्धी केजरीवाल यांचा 3,71,784 मतांच्या मोठ्या फरकाने पंतप्रधान मोदींनी पराभव केला होता. त्या निवडणुकीत केजरीवाल यांना केवळ 2,09,238 मते मिळवता आली होती. तर काँग्रेसचे उमेदवार अजय राय 75,614 मते मिळवून तिसऱ्या नंबरवर राहिले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Marine Projects: ..गोव्यात अखेर '23 प्रकल्‍पांची' मान्यता रद्द! रोजगार तसेच कोटींच्‍या गुंतवणुकीवर पाणी

Rashi Bhavishya 18 October 2024: उत्तम द्रव्यलाभ होईल, व्यावसायिकांसाठी आजचा दिवस आशादायी

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Belgaum Highway: गोवा-बेळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प, दोन्ही बाजूला 4-5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

SCROLL FOR NEXT