Court Dainik Gomantak
देश

Uttar Pradesh Crime: पुत्रप्राप्तीचा हव्यास! गरोदर पत्नीसोबत पतीचं दुष्कृत्य; कोर्टाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा

Uttar Pradesh: विशेष सरकारी वकील (ADGC) मुनेंद्र पाल सिंह यांनी शुक्रवारी सांगितले की, फास्ट ट्रॅक कोर्ट (I) चे अतिरिक्त सत्र न्यायाधीश सौरभ सक्सेना यांनी गुरुवारी संध्याकाळी उशिरा पन्नालालला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

Manish Jadhav

Uttar Pradesh Crime: मुलाच्या हव्यासापोटी पतीने पत्नीवर क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. या अत्यंत भीषण प्रकरणात बदायूं येथील न्यायालयाने आपल्या गर्भवती पत्नीचे पोट विळ्याने फाडल्याप्रकरणी आरोपी पतीला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच त्याला 50 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. विशेष सरकारी वकील (ADGC) मुनेंद्र पाल सिंह यांनी शुक्रवारी सांगितले की, फास्ट ट्रॅक कोर्ट (I) चे अतिरिक्त सत्र न्यायाधीश सौरभ सक्सेना यांनी गुरुवारी संध्याकाळी उशिरा पन्नालालला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. शिक्षेशिवाय त्याला 50 हजार रुपयांचा दंडही ठोठावला. दंड न भरल्यास आणखी सहा महिने कारावास भोगावा लागेल.

या प्रकरणाची माहिती देताना मुनेंद्र पाल सिंह यांनी सांगितले की, सिव्हिल लाइन्स पोलिस (Police) स्टेशन परिसरातील घोंचा गावात राहणारा गोलू याने 19 सप्टेंबर 2020 रोजी पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला. त्यात त्याने आपली बहीण अनिता हिचा विवाह शहरातील नेकपूर मोहल्ला येथील पन्नालाल याच्याशी झाल्याचे सांगितले. अनिताने लग्नानंतर पाच मुलींना जन्म दिल्याचे तक्रारीत म्हटले होते. यावरुन तिचा पती पन्नालाल तिला सतत त्रास देत होता. अनिताला दुसरे लग्न करण्याची धमकीही देत होता.

त्याने पुढे सांगितले की, घटनेच्या वेळी 30 वर्षांची अनिता आठ महिन्यांची गर्भवती होती. दरम्यान, एके दिवशी पन्नालाल घरी आला आणि अनिताशी भांडू लागला. पन्नालाल अनिताला म्हणाला की, तू फक्त मुलींना जन्म देतेस. यावेळी मी तुझं पोट फाडून बघेन की मुलगा आहे की मुलगी. त्यानंतर पन्नालालने अनिताचे पोट विळ्याने फाडले त्यामुळे अनिताची आतडे बाहेर आले आणि आठ महिन्यांच्या बाळाचा गर्भपात झाला. नंतर कळले की तो तान्हा मुलगा होता.

या प्रकरणानुसार, अनिताला गंभीर अवस्थेत बरेली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि तिच्यावर उपचार करण्यात आले. गोलूच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि तपास पूर्ण करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. वरिष्ठ पोलीस अधीक्षक आलोक प्रियदर्शी यांनी सांगितले की, तपास पूर्ण झाल्यानंतर आरोपीविरुद्ध (Accused) न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आणि या प्रकरणाची नियमित सुनावणी घेण्यात आली. ते म्हणाले की, विशेष न्यायालयाने पन्नालालला दोषी ठरवून जन्मठेप आणि 50,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सध्या पन्नालालचे वय 38 वर्षे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: शिक्षकांच्या शैक्षणिक पात्रतेची पडताळणी होणार, अपात्र शिक्षकांना घरी पाठवणार; मुख्यमंत्र्यांची तंबी

Ganesh Festival 2025: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना रेल्वेकडून मोठी भेट; 6 अतिरिक्त विशेष गाड्यांची केली घोषणा!

Sunburn Festival 2025: बरं झालं! सनबर्न गोव्याबाहेर गेल्यावर मंत्री नाईकांची प्रतिक्रिया; म्हणाले, आपली संस्कृती-परंपरा सुरक्षित राहील

Ravichandran Ashwin: 'तुम्ही जे पेराल ते उगवेल'! स्टोक्सच्या 'मस्करी'ला अश्विनचे सडेतोड उत्तर; जाणून घ्या नेमके प्रकरण?

Numerology: जन्मतारखेत दडलेय 'कर्माचे फळ'; या तारखांना जन्मलेल्यांना संघर्ष आणि यशासाठी वाट का पहावी लागते?

SCROLL FOR NEXT