Gorakhpur 
देश

Gorakhpur: गोव्यात नोकरीसाठी घरातून बाहेर पडला, दोन दिवसांनी गोरखपूर रेल्वे स्थानकावर आढळला मृतदेह

श्रावण 28 नोव्हेंबर रोजी दुपारी साडेचार वाजता गोव्याला जायचे म्हणून घरातून बाहेर पडला.

Pramod Yadav

Gorakhpur Railway Station: गोव्यात रोजगारासाठी घरातून बाहेर पडलेल्या युवकाचा मृतदेह गोरखपूर रेल्वे स्थानकावर आढळून आला. श्रावण निषाद असे या तरुणाचे नाव असून, तो दोन मित्रांसोबत कामानिमित्त गोव्यात येण्यासाठी निघाला होता. पण, गोव्याकडे निघण्यापूर्वी त्याचा गोरखपूर रेल्वे स्थानकावर आढळून आल्याने खळबळ निर्माण झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, कप्तानगंज येथील श्रावण निषाद नावाचा तरुण याच गावातील रहिवासी कृष्णा आणि ​​कुलदीप यांच्यासह गोव्यात पेंटिंगच्या कामासाठी येत होते. श्रावण 28 नोव्हेंबर रोजी दुपारी साडेचार वाजता गोव्याला जायचे म्हणून घरातून बाहेर पडला.

दरम्यान, दुसऱ्या दिवशी श्रावणचे मित्र कृष्णा आणि कुलदीप रात्री एक वाजण्याच्या सुमारास लक्ष्मीपूर येथील त्यांच्या घरी आले. त्यांनी श्रावण बाबत विचारणा केली असता, घरातल्यांनी त्याच्याबाबत काही माहिती नसल्याचे सांगितले.

गुरुवारी मृत श्रावणचा भाऊ अजय याच्या मोबाईलवर रेल्वे पोलिसांकडून एक फोन आला. गोरखपूर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक-९ जवळ एक मृतदेह सापडल्याचे त्यांनी सांगितले.

मृताच्या कुटुंबीयांनी घटनास्थळ गाठून मृतदेहाची ओळख पटवली. शवविच्छेदनानंतर मृतदेह घरी आणून कुटुंबीयांनी शुक्रवारी अंत्यसंस्कार केले. कुटुंबीयांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करून कारवाईची मागणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa School Academic Calender: 'विद्यार्थ्यांनो लक्ष द्या'! गोव्यात 1 एप्रिलपासून वाजणार शाळेची घंटा; नवीन शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक जाहीर

Goa Cylinder Stock: '15 दिवस पुरेल इतका सिलिंडरचा साठा उपलब्ध', मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली महत्त्वाची माहिती; केंद्राला पाठवणार राज्याचा अहवाल

अमेरिकेचा भारताला 'सॅल्युट'! तेल बाजारातील स्थिरतेसाठी मोदी सरकारची भूमिका ठरली निर्णायक; अमेरिकन राजदूतांकडून तोंडभरुन कौतुक

Hindu New Year: 19 मार्चपासून हिंदू नववर्षाची सुरुवात! गुरु अन् मंगळच्या आशीर्वादानं उजळणार 'या' 4 राशींचं नशीब; नोकरी अन् शिक्षणात प्रगतीचा योग

''स्वप्नात वाटलं जीजूंनी पकडलं, म्हणून...'', 7 वर्षे कोर्टाच्या फेऱ्या अन् 19 दिवस खाल्ली जेलची हवा; अखेर पॉक्सो कोर्टाकडून एअरफोर्स जवानाची सुटका

SCROLL FOR NEXT