Crime  Dainik Gomantak
देश

Rajasthan पुन्हा हादरले, सीकरमध्ये गॅंगवॉर; लॉरेन्स विश्नोई ग्रुपने स्वीकारली जबाबदारी

Shootout at Sikar: राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यात पोलीस प्रशासन हाय अलर्टवर आहे. सीकरमधील गँगस्टर राजू थेहतच्या हत्येप्रकरणी शेजारील जिल्हेही सतर्क झाले आहेत.

दैनिक गोमन्तक

Sikar Gangwar: राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यात पोलीस प्रशासन हाय अलर्टवर आहे. सीकरमधील गँगस्टर राजू थेहतच्या हत्येप्रकरणी शेजारील जिल्हेही सतर्क झाले आहेत. झुंझुनू जिल्ह्यात सशस्त्र जवानांसह पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली आहे. दरम्यान, सीकरला जाणार्‍या आणि येणाऱ्या वाहनांव्यतिरिक्त शहरांमधील प्रत्येक संशयास्पद वाहनांची झडती घेतली जात आहे. शिवाय, स्थानिक पोलीस संशयितांची कसून चौकशी करत आहेत.

लॉरेन्स गॅंगने जबाबदारी घेतली

राजस्थानमधील (Rajasthan) या मोठ्या गॅंगवॉरमध्ये राजू थेहत याची अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. आता याची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई ग्रुपने स्वीकारली आहे. यानंतर राजस्थान पोलीस पूर्णपणे अ‍ॅक्शन मोड आले आहे. त्याचबरोबर या गॅंगवॉरबाबत भाजप (BJP) नेत्यांनी गेहलोत सरकारवर निशाणा साधला आहे.

बदमाश हरियाणाला पळून जाऊ शकतात

सीकरमध्ये गुन्हा केल्यानंतर हे बदमाश झुंझुनूमार्गे हरियाणात पळून जाण्याच्या तयारीत होते. अशा परिस्थितीत जिल्ह्याचे एसपी मृदुल कछावा स्वतः संपूर्ण नाकाबंदीवर लक्ष ठेवून आहेत. त्याचवेळी एएसपी डॉ. तेजपाल सिंग हेही क्षणोक्षणी अपडेट्स घेत आहेत. दरम्यान, हरियाणाची सीमा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. याशिवाय झुंझुनू शहरातील मांडवा वळणावरही नाकाबंदी करण्यात येत आहे. जिथे प्रत्येक वाहनाची कसून तपासणी करुनच जाण्यास परवानगी दिली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT